20.5 C
New York

Heavy Rain : मुंबईत पावसाचा जोर वाढणार, पुढील काही तास महत्वाचे

Published:

मुंबई शहरासह उपनगरात सध्या जोरदार (Heavy Rain) पाऊस कोसळत आहे. सध्या ढगाळ वातावरण असून रिमझिम पाऊस मुंबईत सर्वत्र सुरू आहे. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे मुंबईची तुंबई झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे अनेक चाकरमान्यांची आठवड्याच्या पहिल्याच दिवशी तारांबळ उडल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी राज्यात चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

Heavy Rain मुंबईत जोरदार पाऊस

मुसळधार पाऊस सकाळपासून मुंबई उपनगरात, विशेषतः अंधेरी, बोरिवली, मालाड, दहिसर, गोरेगाव, विलेपार्ले आणि सांताक्रूझ भागात पडत आहे. कांदिवली-मालाड पश्चिम भागातही जोरदार पाऊस सुरू आहे. सध्या मेट्रो सेवा सुरळीत सुरू आहे. अंधेरी सबवेमध्ये मात्र सततच्या पावसामुळे पाणी तुंबले आहे. यामुळे रस्ते वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे पावसाचा परिणाम वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि लिंकिंग रोडवरही दिसून येत आहे.मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर मालाड-कांदिवली लिंकिंग रोडवर वाहतूक कोंडी झाली आहे.

Heavy Rain मुंबईत जोरदार पाऊस

हवामान विभागाने आज मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे, तर उद्या आणि परवा अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये या आठवड्यात जोरदार पाऊस बरसणार असा अंदाज आहे. मंत्रालय आणि हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई आणि मुंबई उपनगरातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील ३ तासांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शासकीय यंत्रणांकडून नागरिकांनी सतर्क राहावे आणि स्थानिक देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img