23.7 C
New York

Gopichand Padalkar : “सहकाऱ्यांची चूक असेल तर कारवाई करा”, विधानभवन राडा प्रकरणी पडळकरांचं वक्तव्य

Published:

काल विधीमंडळाच्या आवारात जोरदार राडा झाला. आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अंगातील शर्ट फाटेपर्यंत मारामारी झाली. या घटनेने राज्यातील राजकारण आणि समाजमन अस्वस्थ झालं आहे. फक्त मारामारीपर्यंतच हा प्रकार थांबला नाही. तर हा अटक नाट्यावरून गुरुवारी मध्यरात्रीनंतरही चांगलाच राडा झाला. दरम्यान, या संपूर्ण घडामोडींवर आज भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही न्यायालयात जाऊन आमची लढाई लढू, असे वक्तव्य पडळकर यांनी केले आहे. दरम्यान, कार्यकर्त्यांना या मारहाणीत रोखता आले असता या प्रश्नावर मात्र पडळकर अनुत्तरीत झाले.

पडळकर पुढे म्हणाले, या घटनेनंतर कालच मी माझी भूमिका व्यक्त केली आहे. विधानसभा अध्यक्षांकडे दिलगिरी व्यक्त केली. आमच्या सहकाऱ्यांची चूक झाली असेल सक्त ताकीद देऊन त्यांच्यावर कारवाई करा असं मी त्यांना सांगितलं. या प्रकरणी काल कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. आता आम्ही कोर्टात जाऊन आमची लढाई लढू. माझी लक्षवेधी होती त्यासाठी मी दिवसभर विधानसभेत होतो. मात्र नंतर मला कळले की माझी लक्षवेधी नसेल यासाठी मी बाहेर आलो आणि उभा होतो. आम्ही निर्णयाचा आदर करतो आम्ही आमची बाजू कोर्टात मांडू असे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.

दरम्यान, या घटनेनंतर सर्वच क्षेत्रांतून संताप व्यक्त केला जात आहे. विधिमंडळाच्या आवारात अशा पद्धतीने मारामारी होणे अत्यंत चुकीचे असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी या घटनेचा सविस्तर अहवाल मागवण्यात आल्याचे सांगितले. यानंतर आता विधानसभा सुरक्षा कार्यालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. काल विधानभवन येथे राडा झाल्यानंतर आजच्या कामावर त्याचे पडसाद उमटणार आहेत. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात याच मुद्द्यावर जोरदार रणकंदन होण्याची चिन्हे आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img