राज्यात अनेक ठिकाणी पावसाने धुमाकूळ घातला आहे. सध्या पावसाने मुंबई शहर, उपनगर आणि (Maharashtra Rain) कोकणातील काही भागात विश्रांती घेतली आहे. तापमानात पुन्हा वाढ होत आहे. परंतु, हवामान विभागाने पावसाचा इशारा (Rain Alert) दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांना दिला आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर घाटमाथ्यावर पुढील 24 तासांत वादळ वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यलो अलर्ट मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली विदर्भातील अकोला, अमरावती या जिल्ह्यांना जारी करण्यात आला आहे.
24 ते 31 जुलै दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रासह मध्य भारतात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच 31 जुलै ते 7 ऑगस्ट दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल अशी माहिती हवामानतज्ज्ञ केएस होसाळीकर यांनी दिली.
Maharashtra Rain दुबार पेरणीचं संकट
तर दुसरीकडे मराठवाड्यात यंदा पावसाचं प्रमाण कमी असल्याने शेतकरी आता चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र मराठवाड्यात सध्यातरी दमदार पावसाची शक्यता नसल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. सध्या माहितीनुसार, पिके मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सुकत असून पाऊस वेळेवर पडला नाही तर दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांसमोर निर्माण होण्याची शक्यता आहे.