23.7 C
New York

Awhad Vs Padalkar : विधिमंडळातील आव्हाड-पडळकर राड्यापूर्वी पोलिसांनी दिला होता अलर्ट

Published:

राजकीय वातावरण विधिमंडळ परिसरात काल (दि.17) पडळकर आणि आव्हाड (Awhad Vs Padalkar) यांच्या कार्यकर्त्यांमधील राड्यानंतर चांगलेच तापले आहे. या सर्व प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दुपारी दीड वाजता बोलणार आहेत. त्यात ते नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, त्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी समोर आली असून, पोलिसांनी विधानसभा परिसरातील सुरक्षेसंदर्भात एक अहवाल दिला होता. त्यानंतर संध्याकाळी आव्हड आणि पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला.

Awhad Vs Padalkar पोलिसांचा अहवाल नेमका काय?

आव्हड आणि पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा होण्यापूर्वीच्या काही तासांआधीच पोलिसांनी विधानसभा अध्यक्षांना एक अहवाल सोपवला असल्याची माहिती समोर आली. ज्यात विधिमंडळाची सुरक्षा व्यवस्था आणि विधिमंडळात असणार्‍या कार्यकर्त्यांच्या वाढत्या संख्येवरही चिंता व्यक्त करण्यात आली होती.

Awhad Vs Padalkar पोलिसांचा आमदारांवर ठपका

वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त करताना पोलिसांनी सर्वच पक्षाच्या आमदारांवर नियम मोडत असल्याचा ठपका ठेवला आहे. ज्यात अनेक आमदार सभागृहात प्रवेस करण्यापूर्वी लॉबीत कार्यकर्त्यांना सोबत नेतात. अनेकदा या ठिकाणी फोटोसेशनसह दस्ताऐवजांवर स्वाक्षरी करण्याचेही दिसून येत असल्याचे अहवालात पोलिसांनी म्हटल्याचे सांगितले जात आहे.

Awhad Vs Padalkar नियमांना वेळोवेळी केराची टोपली

सादर करण्यात आलेल्या अहवालात विधानभवनाच्या नियमावलींवरही बोट ठेवण्यात आले आहे. नियमांनुसार विधानभवनाच्या लॉबीमध्ये केवळ आमदार आणि त्यांचे अधिकृत शासकीय स्वीय सहाय्यकांनाच प्रवेशाची मुभा आहे. पण, अधिवेशकाळात या ठिकाणी सर्सास नियमांना केराची टोपली दाखवली जाते. एवढेच नव्हे तर, अडवणूक करणाऱ्या सुरक्षा रक्षकांना उडावाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचे नमुद करण्यात आले आहे.

Awhad Vs Padalkar वाहनांवर पास नाही पण गाडी थेट आत…

वरील मुद्द्यांसह पोलिसांनी आमदारांच्या वाहनांच्या एन्ट्रीचाही मुद्दा अधोरेखित केला आहे. विधानभवन परिसरात येणाऱ्या आमदारांच्या वाहनांवर पास नसतानाही अनेकदा थेट प्रवेश केल जात असून, सुरक्षेच्या दृष्टीने हे गंभीर असल्याचेही नमुद करत याकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा अलर्टही पोलिसांच्या अहवालात देण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img