23.7 C
New York

Happy Birthday Priyanka Chopra : प्रियांका चोप्राला दोस्तानाच्या सेटवरून टोमणा, आईनं दिलं ठणकावून उत्तर

Published:

बॉलीवूडची ग्लोबल स्टार ठरलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) ही आज कोणत्याही ओळखीची मोहताज नाही. मात्र तिच्या या यशामागे प्रचंड मेहनत, समर्पण आणि अनेक अडथळ्यांचा संघर्ष दडलेला आहे. प्रियांकाच्या आयुष्यातला असाच एक किस्सा तिच्या आईने डॉ. मधू चोप्रा (Madhu Chopra) यांनी एका मुलाखतीत सांगितला होता, जो ऐकून अनेकजण चकित झाले होते.

हा प्रसंग आहे 2008 मध्ये आलेल्या ‘दोस्ताना’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा. प्रियांका त्या दिवशी खूप आजारी होती. तिला तीव्र ताप आला होता. तरीसुद्धा ती हट्टाने शूटिंगसाठी तयार होत होती. तिच्या अंगात ताप असूनही, ती काम टाळण्याची इच्छा नव्हती. अशा परिस्थितीत तिच्या तब्येतीची काळजी घेत, तिच्या आईने स्वतः चित्रपटाचे दिग्दर्शक तरुण मनसुखानी (Tarun Mansukhani) यांना फोन केला आणि प्रियांका त्या दिवशी शूटिंगला उपस्थित राहू शकणार नसल्याचं सांगितलं.

या वेळी तरुणने “किती सोपं आहे…” असा टोमणा मारल्यामुळे मधू चोप्रांना राग अनावर झाला. त्यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं, “जर तुला वाटत असेल की तिला सेटवर मरण आलं पाहिजे, तर मी तिला पाठवते. पण तिच्यासोबत काही झालं, तर त्यासाठी तू जबाबदार असशील.” हा क्षण दोघांच्या नात्यात एका वेगळ्या वळणाचा ठरला, पण आजही ते याच गोष्टीवरून एकमेकांना मजेशीरपणे चिडवत असतात.

या प्रसंगातून प्रियांकाच्या कामाप्रती असलेल्या निष्ठेचं आणि तिच्या आईच्या कणखर वृत्तीचं दर्शन घडतं. आज प्रियांका तिच्या अभिनय कौशल्यामुळेच नव्हे, तर तिच्या धैर्यामुळेही लाखो चाहत्यांची लाडकी अभिनेत्री ठरली आहे.

सध्या ती अमेरिकेत आपला नवरा निक जोनस आणि त्यांची मुलगी मालती मेरी यांच्यासोबत स्थायिक झाली आहे. प्रियांका फक्त चित्रपटांमुळे नाही, तर तिच्या खासगी आयुष्यामुळे आणि समाजमाध्यमांवरील सक्रियतेमुळेही कायम चर्चेत असते. तिच्या प्रत्येक पोस्टला लाखो लाईक्स मिळतात आणि तिचं प्रत्येक पाऊल चाहत्यांसाठी प्रेरणादायी ठरतं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img