20.6 C
New York

Vidhan bhavan : हाणामारीचा इफेक्ट! विधानभवनात सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना NO ENTRY

Published:

काल विधीमंडळाच्या (Vidhan bhavan) आवारात जोरदार राडा झाला. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. अंगातील शर्ट फाटेपर्यंत मारामारी झाली. या घटनेने राज्यातील राजकारण आणि समाजमन अस्वस्थ झालं आहे. फक्त मारामारीपर्यंतच हा प्रकार थांबला नाही. तर हा अटक नाट्यावरून गुरुवारी मध्यरात्रीनंतरही चांगलाच राडा झाला. दरम्यान, या घटनेनंतर शहाणे होत विधानभवन सुरक्षा कार्यालयाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विधानभवनात प्रवेश बंद करण्यात आला आहे.

Vidhan bhavan नेमकं काय घडलं होतं ?

गेल्या काही दिवसांपासून गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात वाकयुद्ध पाहायला मिळत आहे. तर दोघांकडून एकमेकांना बुधवारी 16 जुलैला शिवीगाळ करण्यात आली होती. तर बाचाबाची होऊन मारहाण दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झाल्याची माहिती समोर आली आहे.यानंतर बुधवारी पडळकर आणि आव्हाड आमनेसामने आले असता दोन्हीकडून एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली होती. यानंतर मला जिवे मारण्याची आमदार आव्हाड यांनी धमकी देण्यात आली असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते विधानभवनाच्या आवारात एकमेकांना भिडले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून राज्य सरकारवर विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल केला आहे.

विधिमंडळाच्या आवारात अशा पद्धतीने मारामारी होणे अत्यंत चुकीचे असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. सर्वच क्षेत्रांतून या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे. विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी या घटनेचा सविस्तर अहवाल मागवण्यात आल्याचे सांगितले. यानंतर आता विधानसभा सुरक्षा कार्यालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आजच्या कामावर काल विधानभवन येथे राडा झाल्यानंतर त्याचे पडसाद उमटणार आहेत. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात याच मुद्द्यावर जोरदार रणकंदन होण्याची चिन्हे आहेत.

Vidhan bhavan सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांंना नो एन्ट्री!

दरम्यान, या घटनेची दखल विधानभवन सुरक्षा कार्यालयाने घेत एक मोठा निर्णय घेतला आहे. आज विधानभवनामध्ये कोणत्याही प्रकारचे शासकीय कर्मचारी अधिकारी यांना येण्यास परवानगी राहणार नाही. विशेष परवानगी पत्र घेऊनच प्रवेश मिळेल. आज सर्व पद्धतीचे इतर पासेस प्रवेशासाठी रद्द करण्यात आले आहेत. विधानभवन कामकाजाचा आज शेवटचा दिवस असतानाच हा निर्णय घेण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img