23.7 C
New York

Gopichand Padalkar- Jitendra Awhad Clash : पडळकर- आव्हाडांमध्ये वाद पेटला, विधिमंडळात कार्यकर्ते भिडले, नेमकं काय घडलं ?

Published:

महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. (Gopichand Padalkar- Jitendra Awhad Clash) राजकारणात रोज नवं नवीन काही ना काही घडत असतं. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात वाकयुद्ध पाहायला मिळत आहे. तर दोघांकडून एकमेकांना बुधवारी 16 जुलैला शिवीगाळ करण्यात आली होती. तर बाचाबाची होऊन मारहाण दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झाल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं काय घडलं त्याबद्दल आलेल्या माहिती नुसार दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये विधानभवनाच्या लॉबीमध्ये धक्काबुक्की झाली आणि यानंतर एकमेकांच्या अंगावर दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी धावून जात मारहाण केली. मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांना तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षक आणि इतरांनी दूर केले.

Gopichand Padalkar- Jitendra Awhad Clash नेमकं प्रकरण काय?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधान भवनाच्या परिसरात आमदार गोपीचंद पडळकर यांना मंगळसूत्र चोर म्हणून डिवचले होते. पडळकर आणि आव्हाड यानंतर बुधवारी आमने- सामने आले असता दोन्हीकडून एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली होती. यानंतरमला जिवे मारण्याची आमदार आव्हाड यांनी धमकी देण्यात आली असल्याचा आरोप केला होता.

तर विधान भवनाच्या दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते आवारात एकमेकांना भिडले. सध्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून विरोधकांकडून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Gopichand Padalkar- Jitendra Awhad Clash मला मारण्यासाठी सगळे आले होते : जितेंद्र आव्हाड

तर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील या प्रकरणात प्रतिक्रिया देत गंभीर आरोप केला आहे. गुंडाना तुम्ही विधानसभेत प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर कोणतेच लोक सुरक्षीत नाहीत. मला शिव्या दिल्या आहेत. कुत्रा, डुक्कर, तुला मारुन टाकू अशा धमक्या दिल्याचे आव्हाड माध्यमांशी बोलताना म्हणाले. तर मला मारण्यासाठी सगळे आले होते असा आरोप आरोप देखील माध्यमांशी बोलताना आमदार आव्हाड यांनी केला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img