24.5 C
New York

Parliament Canteen Menu : मुगाचे धिरडे, ज्वारीचा उपमा अन् शुगर फ्री खीर, खासदारांचा हेल्दी मेन्यू ठरला; वाचा यादी

Published:

संसदेचं कामकाज परिणामकारक होण्यासाठी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला (Om Birla) यांनी खासदार, अधिकारी आणि येथे येणाऱ्या पाहुण्या मंडळींच्या आरोग्यासाठी एक खास (Parliament Canteen Menu) योजना तयार केली आहे. या अंतर्गत आता रागी बाजरी इडली, ज्वारीचा उपमा, मूग डाळीचे धिरडे असे पदार्थ कँटीनच्या थाळीत असतील. कँटीनमधील आहार काय राहिल हे ओम बिर्ला यांनीच ठरवले आहे. आहाराशी कोणतीही तडजोड न करता जनकल्याणाच्या कामांना गती द्यायची आहे असा या मागचा उद्देश आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कँटीनमधील जेवणावरून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. या प्रकारानंतर कँटीनमधील निकृष्ट जेवणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कँटीनमधील खाद्य पदार्थांच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केले जात असताना दुसरीकडे संसदेच्या उपहारगृहात मात्र खासदारांचा हेल्दी मेन्यूही ठरला आहे.

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या सांगण्यानुसार आहार निश्चित करण्यात आला आहे. बऱ्याचदा संसदेचे कामकाज उशिरापर्यंत सुरू राहते अश परिस्थितीत खासदार आणि अधिकाऱ्यांची आबाळ होऊ नये यासाठी हा मेन्यू निश्चित करण्यात आला आहे.

Parliament Canteen Menu कँटीनमध्ये पौष्टिक आहाराची आयडीया

स्वस्थ जीवनशैलीला प्राधान्य देण्यासाठी कँटीनने विशेष मेन्यूला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे आता कँटीनमध्ये स्वादिष्ट पदार्थांबरोबरच बाजरीपासून तयार केलेले खाद्यपदार्थ, फायबर युक्त सॅलड, प्रोटीन पॅक सूप उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या माध्यमातून खासदार, संसदेतील अधिकारी यांचे आरोग्य जपण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img