25.1 C
New York

Heavy Rain : मुंबई, पुणे अन् कोकणात आजही मुसळधार; ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज, यलो अलर्ट जारी

Published:

काही ठिकाणी राज्यात मुसळधार पाऊस होत (Maharashtra Monsoon Alert) आहे. तर पावसाने काही ठिकाणी विश्रांती घेतली आहे. कोकणात अनेक ठिकाणी दोन दिवसांपूर्वी मुसळधार (Heavy Rain) पाऊस झाला. आजही पावसाचा जोर राज्यात अनेक ठिकाणी कायम राहणार आहे. ऑरेंज अलर्ट मु्ंबई, ठाणे, पुणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना जारी करण्यात (Orange Alert) आला आहे. यलो अलर्ट पालघर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना दिला आहे.

हवामान विभागाने नाशिक, धुळे, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. आजही या जिल्ह्यात हलक्या स्वरुपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात शाळा आणि महाविद्यालयांनी (Heavy Rainfall) सुरक्षिततेच्या कारणामुळे सुट्टी देण्यात आली आहे.

Heavy Rain या जिल्ह्यांना ऑरेंज अन् यलो अलर्ट

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई, ठाणे, पुणे, रायगडसगह रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर पालघर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यंना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात आजपासून काही दिवस पावसाची स्थिती कायम राहणार आहे. या दिवसांत ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरुपाचा पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img