चित्रपट प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केवळ 200 रूपयांमध्ये (Film Tickets) आता सर्व चित्रपट पाहता येणार आहेत. होय तुम्ही एकताय हे अगदी खरं आहे. कारण कर्नाटक राज्य सरकारने एक महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. त्यानुसार आता सिंगल स्क्रिन असो वा मल्टीप्लेक्स असो कोणत्याही चित्रपटगृहांमध्ये चित्रपटांची तिकीटं ही 200 रूपयांच्या आत असावी. असे आदेश देण्यात आले आहेत. चित्रपट रसिकांचं त्यामुळे आता कमी पैशांत जास्त मनोरंजन होणार आहे.
Film Tickets कर्नाटक सरकारचा आदेश काय?
कर्नाटक राज्य सरकारने एक महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. त्यानुसार आता सिंगल स्क्रिन असो वा मल्टीप्लेक्स असो कोणत्याही चित्रपटगृहांमध्ये चित्रपटांची तिकीटं ही 200 रूपयांच्या आत असावी. असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामध्ये मनोरंजन कर देखील समाविष्ट असेल. त्यामुळे 200 हीच किंमत प्रेक्षकांकडून आकारली जाणार आहे. हे आदेश राज्यातील सर्व जिल्हे, महानगर आणि छोट्या शहरांमध्ये देखईल लागू केला जाणार आहे.
त्याच बरोबर या आदेशावर जनतेच्या काही सूचना किंवा थिएटर व्यवसायिकांना काही आक्षेप असल्यास तो नोंदवण्याचा पर्याय दिला आहे. त्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या सूचना आणि आक्षेप अतिरिक्त मुख्य सचिव गृह विभाग यांच्याकडे नोंदवण्यात येणार आहेत. तसेच ते विधान करार बंगळुरू येथे देखील नोंदवले जाऊ शकतात. असं यामध्ये म्हटलं आहे.
दरम्यान सरकारच्या या आदेशाचा फायदा हा जास्त तिकीटामुळे चित्रपट पाहण्याकडे पाठ फिरवणाऱ्या सर्वसामान्य प्रेक्षकांना होणार आहे. तसेच कमी तिकीटांमुळे चित्रपटांकडे प्रेक्षकवर्ग वळाल्याने याचा फायदा चित्रपटांना देखील होणार आहे. कारण आशय असणाऱ्या चित्रपटांना देखील स्पर्धा, जास्त तिकिट, थिएटर न मिळणे यांसारख्या कारणांमुळे फटका बसतो. त्यात आता तिकिटांच्या किंमतींचा मुद्दा मात्र कमी होऊ शकतो.