29.4 C
New York

ChatGPT Down : जगभरात ChatGPT ठप्प, हजारो युजर्सच्या तक्रारींचा पाऊस

Published:

OpenAI चे लोकप्रिय चॅटबॉट ChatGPT च्या वापरात जगातील लाखो युजर्सना अडचणी (ChatGPT Down) येत आहेत. अमेरिकेत या समस्येची तीव्रता जास्त होती. येथे साडेआठ हजारांहून अधिक युजर्सने याबाबतीत तक्रारी केल्या. लॉग इन न होणे, एरर मेसेज आणि चॅट लोड न होणे अशा समस्या येत होत्या. या तक्रारींना एआयने प्रतिसाद दिला आहे.

81 टक्के युजर्सना आऊटेज ट्रॅक करणारी वेबसाइट Downdetector नुसार ChtGPT शी संबंधित अडचणी आल्या. तर दहा टक्के लोकांना वेबसाइटमध्ये तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. 9 टक्के युजर्सना मोबाइल अॅपमध्ये अडचणी येत होत्या. भारतातही काही युजर्सना चॅटजीपीटीत अडचणी येत होत्या. परंतु, भारतात या अडचणी फारशा नव्हत्या. सकाळी साडेसात वाजेपर्यंत भारतात फक्त 153 युजर्सने तक्रारी केल्या होत्या. भारतात या अडचणींचं प्रमाण अतिशय नगण्य राहिलं.

युजर्सना चॅटजीपीटीच्या वापरात अनेक प्रकारच्या समस्या जाणवल्या. एरर मेसेज येणे, चॅट लोड न होणे, लॉग इन करतानाही यामध्ये वारंवार अडचणी आणि Unusual Activity चा अलर्ट दिसणे अशा प्रकारच्या समस्या होत्या. या अडचणी बराच काळ निकाली काढण्यात आल्या नाहीत. त्यामुळे युजर्सचा ताण वाढला होता. या समस्या लवकरात दूर करण्याची मागणी केली जात होती.

ChatGPT Down कंपनीचं म्हणणं नेमकं काय ?

OpenAI कंपनीने आपल्या Service Status Page वर या अडचणी मान्य केल्या. या अडचणी नेमक्या काय आहेत याची माहिती घेण्यात आली आहे. या समस्या लवकरात लवकर दूर करण्यासाठी कंपनी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. कंपनीने टेक्निकल टीमला याबाबतीत सूचना दिल्या आहेत. यानंतर टेक्निकल टीमने कामास सुरुवात केली होती. या समस्या दूर झाल्या किंवा नाही याबाबतीत मात्र ठोस माहिती मिळू शकली नाही.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img