29.4 C
New York

Rohit Pawar : शक्तीपीठमध्ये 30 हजार कोटी ढापणार, रोहित पवारांची सरकारवर हल्लाबोल

Published:

सध्या राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना भिडत आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी शक्तीपीठ महामार्गावरून सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारला वाटतं त्यांच्याकडे पैसा मग त्यांचा नाद करायचा नाही. तसेच त्यांनी समृद्धी झालं आता शक्तीपीठमध्ये 30 हजार कोटी ढापणार आहेत. असं रोहित पवार म्हणाले.

Rohit Pawar रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

अधिवेशना दरम्यान रोहित पवार माध्यमांशी संवाज साधतात. तेव्हा त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. रोहित पवार म्हणाले की, गेल्या काही दिवसांत आम्ही विरोधक म्हणून सामान्य जनतेसाठी काही मागणी करतो. तेव्हा सरकार म्हणत, पैसे नाहीत. लाडक्या बहिणी म्हणत आहेत, पैसे द्या, तर त्यांनाही सरकार बोलतंय पैसे नाही. जे कॉन्ट्रॅक्ट केले आहेत. त्यांनाही पैसे दिलेले नाहीत.

पण दुसरीकडे समृद्धी महामार्गात 15 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. या संदर्भात आम्ही सगळे पत्र व्यवहार करणार आहोत. त्याबाबत आम्ही एमएसआरडीसीला आता नोटीस पाठवली आहे. भ्रष्टाचार कसा झाला, काय झाला हे माहित नाही? त्याचबरोबर

पुणे रिंग रोडचं एस्टीमेशन वाढत गेलं आहे. 42 हजार कोटींना हे एस्कलेशन गेलं आहे. तसेच शक्तीपीठ महामार्गाला पॅरेलल एक रस्ता आता नितीन गडकरी यांनी केला आहे. गडकरी साहेबांनी नवीन रस्ता 8 लेनचा केला आहे. 71 कोटी रुपये एक किलोमीटरसाठी गडकरी पैसा खर्च करतात. मग आता पुन्हा शक्तीपीठ महामार्ग का? असा सवाल रोहित पवार यांनी केला.

तसेच सरकारकडून सर्व योजनांना पैसे मिळत नाहीत. या सरकारला असं वाटत की, त्यांच्याकडे पैसा असल्याने त्यांचा नाद करायचा नाही. या सरकारकडून शेतकरी कर्जमाफी, लाडक्या बहिणीचे पैसे, ओपन समाजाच्या मुला-मुलींना पैसे का मिळत नाही? अशी विचारणा यावेळी रोहित पवार यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img