24.3 C
New York

Eknath Shinde VS Uddhav Thackeray : धनुष्यबाणाची लढाई आता ऑगस्टमध्ये, पुढील तारखेची घोषणा

Published:

शिवसेना (Shiv Sena) पक्षाच्या नावावरून आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हावरून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होताच, सुरू असलेला वाद निर्णायक टप्प्यावर पोहोचला. आज (14 जुलै) या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. संपूर्ण राज्याचे या निर्णयाकडे (Eknath Shinde VS Uddhav Thackeray) लक्ष लागले होते. धनुष्यबाण चिन्हावरची आजची सुनावणी संपली. पुढची तारीख ऑगस्टमध्ये देण्यात आली आहे. आता पुढच्या महिन्यात यावर सुनावणी होणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत, त्यामुळे उद्धव गटाने न्यायालयाकडे तात्पुरता आदेश (अंतरिम रिलीफ) मागितला आहे. शिंदे गटाच्या वकिलांनी दुसरीकडे यास विरोध दर्शवला. शिंदे गट ‘शिवसेना’ नाव व ‘धनुष्यबाण’ चिन्हाखाली लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आधीच लढल्या असून, न्यायालयाने उद्धव ठाकरे यांची यापूर्वी अशीच मागणी फेटाळली होती, असा युक्तिवाद त्यांनी केला होता.

Eknath Shinde VS Uddhav Thackeray शिंदे गटाला मान्यता आणि न्यायालयीन लढा

एकनाथ शिंदे यांनी जून 2022 मध्ये शिवसेनेतून बंड केल्यानंतर भाजपसोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केले अन् मुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांनी शिवसेनेवर आपला दावा सादर केला. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला 16 फेब्रुवारी 2023 रोजी ‘खरी शिवसेना’ म्हणून मान्यता दिली आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह देखील दिलं. उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

Eknath Shinde VS Uddhav Thackeray बंडखोर आमदारांना नोटीस

10 जानेवारी 2024 रोजी शिंदे गटालाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही खरी शिवसेना मानले. याविरुद्ध कपिल सिब्बल यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाने पुन्हा न्यायालयात धाव घेतली. 22 जानेवारी 2024 रोजी एकनाथ शिंदेसह सर्व बंडखोर आमदारांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली. आज या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. या याचिकेचा निकाल स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निर्णायक आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img