23 C
New York

 Ujjwal Nikam : राज्यसभेवर नियुक्त होताच उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया काय?

Published:

राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून राज्यसभेव रज्येष्ठ आणि प्रख्यात कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती कोट्यातून ही नियुक्ती करण्यात आली आहे. उज्ज्वल निकम यांच्याबरोबरच भारताचे माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, शिक्षणतज्ज्ञ सी सदानंदन मास्ते, शिक्षणतज्ज्ञ मीनाक्षी जैन यांचीही राष्ट्रपती नामनिर्देशित सदस्य म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती झाल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विशेष आभार मानले.

“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझ्याशी मराठीत संभाषण केले. त्यांनी मला सांगितले की राष्ट्रपती महोदय तुमच्यावर एक जबाबदारी सोपवू इच्छितात आणि ही जबाबदारी देशाच्या दृष्टीकोनातून चांगली सांभाळाल याच्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो. मी देखील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचप्रमाणे भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तमाम भाजप पक्षाने माझ्यावर लोकसभा निवडणुकीवेळी जो विश्वास प्रकट केला होता, तो यावेळी सार्थ करुन दाखवेन, असे उज्जवल निकम म्हणाले.

 Ujjwal Nikam माझ्यावर मोठी जबाबदारी

अर्थात राष्ट्रपती नियुक्त सदस्य असल्याने माझ्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. त्यामुळे कायद्याचा अभ्यास, कायद्याचे विश्लेषण या देशाच्या ऐक्याकरता, देशातील लोकशाही, आमचं संविधान हे कशारितीने प्रबळ राहिल, याची काळजी घेण्याकरिता मी माझ्या बुद्धीच्या कृतीप्रमाणे मी निश्चित प्रयत्न करेन, असं मी आपल्या महाराष्ट्राच्या जनतेला आश्वासित करतो. कारण महाराष्ट्रातून माझ्या एकट्याचीच नियुक्ती राष्ट्रपतींनी केली आहे. त्यामुळे राष्ट्रपती महोदयांचे मी व्यक्तीश: आभारी आहे. तसेच निश्चित मला कल्पना आहे की ही जबाबदारी जरी मोठी असली तरी आपल्या सर्वांचे, महाराष्ट्रातील जनतेचे, इतर भाषिकांचे सहकार्य मला मिळेल यात शंका नाही, असेही उज्ज्वल निकम यांनी म्हटले.

त्याचप्रमाणे अनेक दहशतवाद्यांचे खटले चालवत असताना मला आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला सहकार्य केले. त्यामुळे आपल्या शुभेच्छा माझ्या पाठीशी राहितील, यात मला शंका नाही. आपल्याला एक विधायक काम करायचं आहे की हा देश हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत एकसंघ कसा आहे, हे आपल्याला दाखवायचं आहे. त्या दृष्टीकोनातून सर्वांच्या शुभेच्छा मला लागतील, यात शंका नाही, असेही ते म्हणाले.

 Ujjwal Nikam राजकीय शक्तींनी विसरु नये हीच माझी सूचना

लोकसभेच्या निवडणुकीवेळी मी लोकसभेपुरता त्यात होतो. लोकसभा निवडणूक ही एका वेगळ्या मुद्द्यावर लढली गेली, जिथे गैरसमजुती पसरवल्या गेल्या. जिथे गैरसमजुतीला लोक बळी पडले. परिणाम जेव्हा लोकांच्या लक्षात आले आपलं चुकलं. कसाबच्या गोळीने आमच्या शहिदांच्या हत्या झाली नाही असे ही पसरवले. पण हा फेक नरेटिव्ह विधानसभेला जनतेने हाणून पाडला. आमची जनता ही साक्षर आहे हे काही राजकीय शक्ती विसरतात, त्यांनी ते विसरु नये हीच माझी सूचना आहे, असे उज्जवल निकम यांनी लोकसभा निवडणुकीतील अनुभवावर भाष्य केले.

 Ujjwal Nikam पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया

उज्ज्वल निकम यांचे कायदेशीर क्षेत्रातील आणि आपल्या संविधानाप्रती असलेली निष्ठा अनुकरणीय आहे. ते केवळ एक यशस्वी वकीलच नाहीत, तर महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये न्याय मिळवण्यातही ते नेहमीच आघाडीवर राहिले आहेत. राष्ट्रपतींनी त्यांना राज्यसभेवर नामांकित केले आहे, हे आनंददायी आहे. त्यांच्या संसदीय कारकिर्दीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img