22.7 C
New York

South Actor Kota Srinivasa Rao : अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांचे निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Published:

कोटा श्रीनिवास राव (South Actor Kota Srinivasa Rao) दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांपैकी एक असलेल्या यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने अनेक दशके प्रेक्षकांच्या मनावर (Entertainment News) राज्य केले. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांचं निधन झालंय. त्यामुळे मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी ट्विट करून अभिनेत्याच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला आहे. हे चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान असल्याचं म्हटलंय.

South Actor Kota Srinivasa Rao भूमिका अविस्मरणीय

अभिनेते कोटा श्रीनिवास यांच्या निधनाबद्दल आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून ट्विट केलंय. त्यांनी लिहिलंय की, आपल्या बहुमुखी भूमिकांनी चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकणारे प्रसिद्ध अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांचे निधन अत्यंत दुःखद आहे. चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात त्यांचे कलात्मक योगदान आणि जवळजवळ चार दशकांपासून त्यांनी साकारलेल्या (Kota Srinivasa Rao Passed Away) भूमिका अविस्मरणीय राहतील. खलनायक आणि पात्र कलाकार म्हणून त्यांनी साकारलेल्या असंख्य संस्मरणीय भूमिका तेलुगू प्रेक्षकांच्या हृदयात कायमच्या कोरल्या जातील. तेलुगू चित्रपट उद्योगाचे त्यांचे निधन अपूरणीय नुकसान आहे. 1999 मध्ये, त्यांनी विजयवाडा येथून आमदार म्हणून विजय मिळवला आणि जनतेची सेवा केली. मी त्यांच्या कुटुंबियांना माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो.

South Actor Kota Srinivasa Rao 750 हून अधिक चित्रपट

दिवंगत अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांचा एक फोटो नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ते खूप कमकुवत दिसत होते. त्यांची प्रकृती पाहून त्यांचे चाहते खूप चिंतेत पडले होते. या चित्रात दिवंगत अभिनेत्याच्या एका पायावर पट्टी बांधलेली होती. दुसऱ्या पायावरही जखमांच्या खुणा होत्या. यावरून त्यांची आजारी प्रकृती दिसून येत होती. कोटा श्रीनिवास राव हे तेलुगू चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव होते. त्यांनी 1978 मध्ये ‘प्रणम खारीदू’ या चित्रपटातून पदार्पण केले. 40 वर्षांहून अधिक काळाच्या त्यांच्या अभिनय कारकिर्दीत त्यांनी 750 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले.

South Actor Kota Srinivasa Rao पद्मश्रीने सन्मानित

चित्रपटांमध्ये खलनायक, सहाय्यक अभिनेता आणि विनोदी कलाकाराच्या भूमिका साकारल्याबद्दल त्यांना 9 वेळा नंदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 2015 मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. त्यांचे प्रमुख चित्रपट ‘दम्मू’, ‘सन ऑफ सत्यमूर्ती’ आणि ‘डेंजरस खिलाडी’ होते. तेलुगू व्यतिरिक्त, राव यांनी तमिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळम चित्रपटांमध्ये अनेक चित्रपट केले होते. राव यांनी राजकारणातही काम केले. 1999 ते 2004 पर्यंत ते आंध्र प्रदेशातील विजयवाडा पूर्वचे आमदार होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img