राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू असताना आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या जवळ येत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा जयंत पाटील यांनी (Jayant Patil) दिलाय. त्यांच्या जागी विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांची शक्यतो निवड होणार आहे, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांचा हा वैयक्तिक प्रश्न आहे. ज्यांनी राजीनामा दिलाय, त्यांनाही शुभेच्छा. जे नवीन आलेत त्यांनाही शुभेच्छा. सगळ्यांनी चांगलं काम करावं ही शुभेच्छा. तर जयंत पाटील महायुतीत येणार का, या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (CM Devendra Fadnavis) ‘नाही’ असं उत्तर दिलंय.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Mahayuti) राज्यातील सर्व शिवप्रेमींना शुभेच्छा दिल्या आहेत. नरेंद्र मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्याकरिता दिले होते. त्यांच्याकडे नामांकनाकरिता सात वेगवेगळ्या साईट्स गेल्या होत्या. यापैकी पंतप्रधानांनी हा निर्णय केला. युनेस्कोने सगळ्या किल्ल्यांना भेट दिली. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली टेक्निकल प्रदर्शन केलं, अशी माहिती यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
CM Devendra Fadnavis नऊ कोटी प्रवाशांसाठी
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कामाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्र्यांसह आले होते. यावेळी ते बोलत होते. रनवे पासून टर्मिनल बिल्डिंगपर्यंत संपूर्ण कामाची माहिती (Maharashtra Politics) घेतली. भौतिक प्रगती 94 टक्के झाली असल्याची माहिती यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. सगळं काम वेगाने सुरू आहे. अतिशय चांगल्या प्रकारची सिस्टीम केलेली आहे. या विमानतळावर बॅगेज क्लेम ही जगातील फास्टेस सर्व्हिस करण्याचा प्रयत्न आहे. नऊ कोटी प्रवाशांसाठी हे विमानतळ सुसज्ज होणार असल्याचं देखील फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलंय. 30 सप्टेंबरपर्यंतचं टार्गेट दिलं आहे. तोपर्यंत काम संपवायचं असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत.
CM Devendra Fadnavis विमानतळ महत्त्वाचे ठरेल
हे मुंबईच्या विमानतळापेक्षा मोठं असेल. तसेच चारही दिशांनी येण्यासाठी मेट्रो, रेल्वे, जलवाहतूक, रस्ते – कनेक्टिव्हिटीची सोय असेल. प्रवाशांना एअरपोर्टमध्येच बॅगेज चेकिंग करता येऊ शकते असे संयंत्र उभारले जात आहे. सिडको आणि इतर उपक्रमांनी 30 सप्टेंबरपर्यंत कामगारांची संख्या दुप्पट करावी, अशी निश्चिती मुख्यमंत्रींनी दिली. प्रवाशांसाठी हे विमानतळ महत्त्वाचे ठरेल. अंडरग्राउंड मेट्रोमुळे कोणालाही पायी चालावी लागणार नाही, असं देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.