देश-परदेशातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शनिशिंगापूर ट्रस्टला अखेर देवभाऊंच्या सरकारने जोरदार दणका दिला. या ट्रस्टने 500 कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला होता. तर शनिशिंगणापूर मंदिर विश्वस्त मंडळ राज्य सरकारने (Devendra Fadnavis) बरखास्त करण्याची घोषणा शुक्रवारी विधानसभेत केली. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. भाविकांच्या श्रद्धेशी खेळणाऱ्या विश्वस्तांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. स्वतःची पोळी श्रद्धेच्या बाजाराआड भाजणाऱ्यांवर कारवाईवर भाविकांनी आनंद व्यक्त केला आहे.
Devendra Fadnavis विश्वस्तांच्या पाठी साडेसाती
देवाच्या नावावर घोटाळे करणाऱ्यांना सोडणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. विश्वस्तांच्या अपसंपदेची, संपत्तीची चौकशी करण्यात येणार आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. या भ्रष्टाचारप्रकरणी विश्वस्तच नाही तर इतर अधिकारी, कर्मचारी यांच्यावरही कारवाईची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. घोटाळ्याचे हे रॅकेट मोठे असल्याचे प्राथमिकदृष्ट्या समोर येत आहे. या विश्वस्तांच्या आणि घोटाळेबाजांच्या पाठी आता शनिची साडेसातीच लागल्याचे समोर येत आहे.
घरे आणि दुकानांना ज्या शनी शिंगणापूरमध्ये कुलूप किंवा दरवाजे नाहीत. कारण चोरी किंवा इतर गुन्हे करणाऱ्यांना भगवान शनी शिक्षा करतात. असा गावकऱ्यांचा विश्वास विश्वास आहे. मात्र त्याच शनी शिंगणापूर देवस्थानमध्ये दोन हजार 474 इतके बोगस कर्मचारी दाखवून, मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याशिवाय बनावट अॅपद्वारे भक्तांची आर्थिक लूटही करण्यात आली. या प्रकरणी तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत शुक्रवारी दिले. शनिदेवाने गैरप्रकार करणाऱ्यांना आपला प्रताप दाखवेल असं ह ते म्हणाले.
नेवासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विठ्ठल लंघे यांनी शनी शिंगणापूर देवस्थानातील गैरप्रकारांबाबत लक्षवेधीद्वारे प्रश्न उपस्थित केला होता. यापूर्वीही लंघे यांच्यासह चंद्रशेखर बावनकुळे यांनीही हाच प्रश्न उपस्थित केला होता. त्यानुसार चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने दिलेल्या अहवालानुसार, ईश्वराच्या ठिकाणीही लोक किती भ्रष्टाचार करू शकतात? याचा भयानक नमुना पुढे आल्याचे फडणवीस यांनी उत्तरादरम्यान सांगितले.
तसेच पुढे बोलताना या देवस्थानचा कारभार पूर्वी 258 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सुरू होता. तेथे आता दोन हजार 474 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्याचे भासवण्यात आले. स्थास्थानिक कार्यकर्त्यांना बँके खाते उघडून त्यांच्या खात्यांवर देवस्थानच्या खात्यातून पगाराच्या रूपाने पैसे देण्यात आल्याचे फडणवीस म्हणाले. त्यामुळे आता या प्रकरणी पुढील कधी होते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.