गुजरातमधील अहमदाबाद येथे मागील महिन्यात (Ahmedabad Plane Crash) विमानाचा मोठा अपघात झाला होता. उड्डाण घेताच विमान (Air India Plane Crash) कोसळले होते. या दुर्घटनेत विमानातील एक प्रवासी वगळता सर्वजण मृत्यूमुखी पडले होते. आता या अपघाताबाबत विमान दुर्घटना तपास संस्थेने प्रारंभिक अहवाल सादर केला आहे. या अहवालात धक्कादायक माहिती नमूद करण्यात आली आहे. यानुसार विमानाने उड्डाण केल्यानंतर दोन्ही इंजिन अचानक बंद झाले होते. यामुळे विमानाला पॉवर मिळाली नाही आणि विमान कोसळले.
AAIB च्या रिपोर्टनुसार विमानाने योग्य पद्धतीनेच टेक ऑफ केले होते. यानंतर सर्व काही सुरळीत सुरू होते. पण त्याचवेळी विमानातील दोन्ही इंजिनाच्या फ्यूल कटऑफ स्विच ‘रन’मधून ‘कटऑफ’ मध्ये गेले. याचा अर्थ असा की इंजिनला इंधनाचा पुरवठा बंद झाला. इंजिनला इंधन मिळाले नाही त्यामुळे त्याला ताकद मिळाली नाही आणि विमान क्रॅश झाले.
Ahmedabad Plane Crash पायलटमधील संवादातून मोठा खुलासा
या रिपोर्टमध्ये विमानाच्या पायलटमध्ये नेमका काय संवाद झाला याचाही खुलासा करण्यात आला आहे. पायलट सुमित सभरवाल आणि को-पायलट कुंदर यांच्यातील संवाद या रिपोर्टमध्ये आहे. इंजिन का बंद झालं हाच सर्वात मोठा प्रश्न होता याचं उत्तर कॉकपिट रेकॉर्डिंगमधून मिळालं आहे.
पहिला पायलट दुसऱ्या पायलटला म्हणाला, ‘तू स्विच का बंद केलंस?’ त्यावर दुसरा पायलट उत्तरला ‘मी नाही बंद केलं.’ असा संवाद यात आहे. याचा अर्थ असा निघतो या दुर्घटनेत दोन्ही वैमानिकांनी जाणूनबुजून विमानाचे इंजिन बंद केले नाही. तांत्रिक कारणामुळे असे घडू शकतो असा सूर या अहवालात दिसून येत आहे. तरीदेखील मानवी त्रुटींची शक्यता देखील नाकारता येत नाही. विमान अपघाताची सविस्तर चौकशी अजून सुरू आहे. दोन्ही इंजिन आपोआप कसे बंद झाले, नेमकं काय घडलं होतं याची माहिती घेण्याचं काम सुरू आहे.
Ahmedabad Plane Crash इंजिन चालू करण्याचे प्रयत्न
इंजिन बंद झाल्यानंतर रॅम एअर टर्बाइन (RAT) बाहेर आले होते. विमानाला आपत्कालीन ताकदीची गरज होती असा याचा अर्थ होता. यानंतर बंद पडलेले इंजिन सुरू करण्याचे प्रयत्न झाले होते. परंतु, वेळ निघून गेली होती. विमान आणखी हवेत जाऊ शकले नाही. विमानतळाची भिंत (Airport) पार करण्याआधीच कोसळले.