22.9 C
New York

Microsoft use AI : AI च्या मदतीने मायक्रोसॉफ्टने वाचवले 50 कोटी डॉलर; कंपनीने नक्की काय केलं?

Published:

सहा हजार कर्मचाऱ्यांना मायक्रोसॉफ्टनं नारळ दिला.. तब्बल 3 हजार कर्मचाऱ्यांना मेटाने घरचा (Microsoft use AI) रस्ता दाखवण्याची तयारी केली.. मोठ्या कंपन्यांतील अशा आतल्या बातम्या धडकी भरवणाऱ्या आहेत. नोकऱ्यांवर गंडांतर येण्याचं कारण काय तर AI. असंच बहुतेकांचं म्हणणं आहे. यात काही तथ्यही आहे. एआयमुळे (Artificial Intelligence) रोजगारावर परिणाम झाला ही गोष्ट नाकारता येणार नाही. पण याच एआयने तितक्याच नव्या संधीही निर्माण केल्या आहेत. कंपन्यांना या तंत्रज्ञानाचा मोठा फायदा होत आहे. मायक्रोसॉफ्ट तर एआयचा वापर करून लाखो डॉलर्सची बचत करत असल्याची बातमी आहे.

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार नुकत्याच एका प्रेझेंटेशन दरम्यान कंपनीचे वरिष्ठ अधिकारी जडसन अल्थॉफ यांनी दावा केला की कंपनीने मागील वर्षात कॉल सेंटरमध्ये 50 कोटी डॉलर्सपेक्षा जास्त पैशांची बचत केली. या कामगिरीचं श्रेय एआय टूल्सला जाते. त्यांनी विक्री, सपोर्ट आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरींगमध्ये उत्पादकतेत आश्वासक सुधारणा घडवून आणल्या.

कंपनीसाठी ही बाब फायद्याची असली तरी अधिकाऱ्याची टिप्पणीच्या वेळेने अस्वस्थता निर्माण केली आहे. एक आठवड्याआधी कंपनीने तब्बल 9 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. अशा परिस्थितीत कंपनीकडून खर्च आणि वर्कफ्लो ऑप्टिमायजेशनचं कौतुक करणं अनेकांना चुकीचं वाटत आहे. कंपनीने ज्या कर्मचाऱ्यांची कपात केली आहे त्यांच्यापुढे आता रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

Xbox गेम स्टुडिओचे निर्माते मॅट टर्मबुल यांनी लिंक्डइनवर एक पोस्ट केली होती. नंतर ही पोस्ट हटवण्यात आली. मात्र अधिक संभ्रमात या या मुद्द्याला पोस्टने टाकलं आहे. चॅटजीपीटी आणि कोपायलट यांसारखे एआय टूल कर्मचारी कपातीचा भार सांभाळण्यात मदत करू शकतात. त्यांच्या या पोस्टवरही अनेकांनी संताप व्यक्त केला होता.

AI कुठे कमी पडतो

रोज पुनरावृत्ती होणारी कामे AI कडून करुन घ्या. जेणेकरून तुमच्या वेळेत बचत होईल. यामाध्यमातून तुमची कल्पकता आणि उत्पादकता वाढवा. AI सगळी कामं करू शकतो. पण माणसांतील समज, टीमवर्क, नेतृत्व, कल्पकता या गोष्टी AI आणू शकत नाही. यात स्वतःला अपस्किल करा. वेळेनुसार लहान लहान कोर्स करत राहा. AI टूल्स रोजच्या कामांसाठी वापरत चला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img