22.9 C
New York

Ahmedabad Plane Crash : “तुम्ही फ्यूल बंद केलं का?”, अपघाताआधी पायलट्सचा अखेरचा संवाद

Published:

मागील महिन्यात (Ahmedabad Plane Crash) गुजरातमधील अहमदाबाद येथे विमानाचा मोठा अपघात झाला होता. विमान (Air India Plane Crash) उड्डाण घेताच कोसळले होते. एक प्रवासी वगळताया दुर्घटनेत विमानातील सर्वजण मृत्यूमुखी पडले होते. आता या अपघाताबाबत विमान दुर्घटना तपास संस्थेने प्रारंभिक अहवाल सादर केला आहे. या अहवालात धक्कादायक माहिती नमूद करण्यात आली आहे. या अहवालात विमानातील दोन पायलटचा संवाद नमूद करण्यात आला आहे. त्यांच्या संवादातून मोठा खुलासा झाला आहे.

बोईंग ड्रीमलायनर 787 विमान उड्डाण घेताच अवघ्या एक मिनिटात कोसळलं. या कालावधीत विमानातील दोन पाटलटमध्ये झालेला संवाद कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरमध्ये (सीव्हीआर) टिपण्यात आला आहे.

Ahmedabad Plane Crash पायलटमधील संवादातून मोठा खुलासा

या रिपोर्टमध्ये विमानाच्या पायलटमध्ये नेमका काय संवाद झाला याचाही खुलासा करण्यात आला आहे. पायलट सुमित सभरवाल आणि को-पायलट कुंदर यांच्यातील संवाद या रिपोर्टमध्ये आहे. इंजिन का बंद झालं हाच सर्वात मोठा प्रश्न होता याचं उत्तर कॉकपिट रेकॉर्डिंगमधून मिळालं आहे. पहिला पायलट दुसऱ्या पायलटला म्हणाला, ‘तू स्विच का बंद केलंस?’ त्यावर दुसरा पायलट उत्तरला ‘मी नाही बंद केलं.’ असा संवाद यात आहे. याचा अर्थ असा निघतो या दुर्घटनेत दोन्ही वैमानिकांनी जाणूनबुजून विमानाचे इंजिन बंद केले नाही. तांत्रिक कारणामुळे असे घडू शकतो असा सूर या अहवालात दिसून येत आहे.

Ahmedabad Plane Crash काय झालं होतं ?

एअर इंडियाचे बोइंग 787-8 विमान अहमदाबाद येथून लंडनला निघाले होते. टेकऑफ घेतल्यानंतर काही मिनिटांतच विमान क्रॅश झाले. हा अपघात 12 जून रोजी दुपारी 1.39 वाजता झाला.

Ahmedabad Plane Crash तपासात कोण कोण सहभागी

या विमान अपघाताचा तपास एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्वेस्टिगेशन ब्यूरो (AAIB) कडून केला जात असून यात अनेक एक्सपर्ट्सची मदत घेतली जात आहे. अमेरिका (NTSB), ब्रिटन (AAIB-UK), पोर्तुगाल आणि कॅनडा या देशांतील तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे.

Ahmedabad Plane Crash किती लोकांचा मृत्यू, किती नुकसान

या विमान अपघातात एकूण 229 प्रवासी, 12 क्रू मेंबर, 19 जमिनीवर उपस्थित असणारे लोक असे एकूण 260 लोक मृत्यूमुखी पडले. तर एक प्रवासी या अपघातात गंभीर जखमी झाला होता. विमान जळून खाक झाले. या भागातील पाच इमारतींना आग लागली होती. विमानााने धडक दिल्याने या इमारतींचे मोठ नुकसान झाले होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img