राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये खांदेपालट करण्यात आली आहे. जयंत पाटील (Jayant patil) राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता शशिकांत शिंदे यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येणार आहे. शशिकांत शिंदे यांच्यावर पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार सोपवण्यासाठी मंगळवारी पक्षाची सर्वसाधारण सभा होणार आहे. त्यावेळी शशिकांत शिंदे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाईल.