21.7 C
New York

Mumbai Accident news : मुंबईत बेस्ट बस आणि ट्रकचा मोठा अपघात, 6 प्रवासी गंभीर जखमी

Published:

मुंबईत एका बेस्ट बसचा ट्रकला धडकून अपघात झाल्याची माहिती (Mumbai Accident news) समोर आली आहे. या अपघातामध्ये बसमधील पाच ते सहा गंभीररित्या जखमी झाल्याचे समजते. प्राथमिक माहितीनुसार, पश्चिम द्रुतगती मार्गावर (Western Express Higway) सकाळी सव्वा सहाच्या सुमारास हा अपघात घडला. बोरिवलीहून अंधेरीच्या (Andheri) दिशेने ही बस जात होती. बेस्ट चालकाचे गोरेगाव परिसरात वनराई पोलीस स्टेशनच्या हद्दीतून जात असताना बसवरील (BEST Bus) नियंत्रण सुटले.

यावेळी बस प्रचंड वेगात होती. नियंत्रण सुटल्यामुळे बेस्ट बसने एका ट्रकला (Truck) मागून जोरदार धडक दिली. ही धडक जोरदार असल्यामुळे बसमध्ये असलेले पाच ते सहा प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. जोगेश्वरीतील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

बेस्ट बसचा पुढील एका बाजूचे या अपघातामध्ये मोठे नुकसान झाले आहे. तर धडक बसल्यामुळे ट्रकच्या मागच्या बाजूचे नुकसान झाले आहे. ही धडक अत्यंत जोरदार होती. त्यामुळे दोन्ही वाहनांचे काही भाग तुटून रस्त्यावर पडले होते. बेस्ट बसमध्ये सकाळची वेळ असल्यामुळे तुरळक प्रवासी होते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. वनराई पोलीस ठाण्यात बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी बेस्ट बसच्या चालकाला ताब्यात घेतले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img