22.1 C
New York

Rain Alert : विदर्भाला पावसानं झोडपलं, चंद्रपुरात शाळांना सुट्

Published:

पावसानं विदर्भाला झोडपून काढलं आहे, नागपूर जिल्ह्यात पावसामुळे (Rain Alert) मोठं नुकसान झालं, अनेकांच्या घरात पाणी शिरल्याचं देखील पाहायला मिळालं. दरम्यान दुसरीकडे अमरावती, गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये देखील मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. पुराचा धोका वाढल्यानं चंद्रपूर जिल्ह्यात उद्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Rain Alert उद्या शाळेला सुट्टी

जोरदार पावसानं चंद्रपूर जिल्ह्यात हजेरी लावली आहे, गोसेखुर्द धरणाच्या पाणीपातळीत मुसळधार पावसामुळे वाढ झाली आहे. त्यामुळे या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. एकीकडे आधीच नद्यांना मुसळधार पावसामुळे पूर आला आहे, त्यातच गोसेखुर्द धरणातून आता दुसरीकडे पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं पूर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर उद्या जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि कॉलेज यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सुट्टी देण्यात आली आहे.

Rain Alert गडचिरोलीलाही पावसानं झोडपलं

दरम्यान दुसरीकडे गडचिरोलीलाही पावसानं चांगलंच झोडपलं आहे. मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील दुसरा राष्ट्रीय महामार्गही बंद झाला आहे. त्यामुळे जवळपास सहा तालुक्यांचा गडचिरोली जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. चामोर्शी,अहेरी, भामरागड मुलचेरा, एटापल्ली, सिरोंचा या सहा तालुक्याच्या संपर्क जिल्हा मुख्यालयाशी तुटला आहे.

Rain Alert अमरावतीमध्ये मुसळधार पाऊस

सध्या जोरदार पाऊस अमरावती जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये सुरू आहे. नागपूर -छत्रपती संभाजीनगर एक्स्प्रेस वे वर पावसामुळे पाणी साचलं आहे. दुसरीकडे देवगाव- बोरगाव जवळ धामणगाव तालुक्यातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक बंद केली. महामार्गावर वाहतूक बंद झाल्यामुळे वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. हवामान विभागाकडून दरम्यान पुढील दोन दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, प्रशासनाकडून नागरिकांना या पार्श्वभूमीवर सतर्कतेच आवाहन करण्यात आलं आहे, तसेच आवशकता असेल तरच घराबाहेर पडा असंही स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img