विदर्भात पावसाने धुमाकूळ घातला आहे. येथे अतिमुसळधार अनेक ठिकाणी (Maharashtra Weather Update) पाऊस झाला आहे. नद्यांना पूर (Heavy Rain in Vidarbha) आला आहे. धरणांतूनही पाणी सोडण्यात आले आहे. आज मात्र काही ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे. हवामान विभागाने आजपासून राज्यात पावसाचा (IMD Rain Alert) जोर ओसरणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याचबरोबर विदर्भात मात्र पावसाचा जोर कायम राहणार आहे. आज अतिमुसळधार पावसाचा इशारा चंद्रपूर जिल्ह्यात देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भात आजही पावसाचा जोर कायम राहणार आहे. आज अतिमुसळधार पावसाचा इशारा चंद्रपूर जिल्ह्यात देण्यात आला आहे. तसेच कोकणातील रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होईल असा अंदाज आहे. उर्वरित भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल असा अंदाज आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही हलका पाऊस होईल
गेल्या काही आठवड्यांपासून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू असून, IMD ने पाच ते आठ जुलैपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज दिला होता. त्यानुसार राज्यात अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला. आजही काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तेव्हा नागरिकांनी घरे सुरक्षित ठेवून, बाहेर जाण्यासाठी सूचनांचे काटेकोर पालन करावे. राज्यात मुसळधार पाऊस (Heavy Rain) गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे. उद्यापासून मात्र काही ठिकाणी पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.