23.1 C
New York

Farmer suicide : शेतकरी आत्महत्यांची विधान परिषदेत धक्कादायक माहिती, किती जणांनी जीवन संपवलं?

Published:

शेती पिकवणाऱ्या शेतकरी राजावर कायम आत्महत्या करण्याची वेळ येते. सर्व राजकीय लोक त्याला पाठिंबा दर्शवत असले त्याच्याकडे कुठलाच (Farmer suicide ) असा ठोस पर्याय सरकारने कधी तरी उभा केलेला नाही. यावर्षी राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत असल्याचं वास्तव सरकारने नुकतंच विधान परिषदेत मांडलेल्या आकडेवारीतून स्पष्ट केलं आहे.

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी राज्यात तब्बल 767 शेतकऱ्यांनी या वर्षी जानेवारी ते मार्च 2025 या अवघ्या 3 महिन्यांच्या कालावधीत आत्महत्या केल्याची माहिती दिली आहे. विरोधी पक्षाच्या आमदारांनी वाढत्या शेतकरी आत्महत्यांबद्दल प्रश्न उपस्थित केल्यानंतर राज्याचे मदत आणि पुनर्वसन विभागाचे मंत्री मकरंद पाटील यांनी विधान परिषदेत त्यांच्या लेखी उत्तरात ही आकडेवारी सादर केली.

Farmer suicide 20 टक्क्यांची वाढ

राज्य महसूल विभागाच्या अहवालानुसार, 2025 च्या पहिल्या सहामाहीत (1 जानेवारी ते 26 जून) तब्बल 520 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे. ही संख्या 430 आत्महत्यांपेक्षा 20 टक्क्यांनी जास्त 2024 मधील याच कालावधीतील आहे. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, कधी पीकविम्याची प्रतिक्षा, कधी बाजारभावाची अनिश्चितता अशा हे संकटांच्या साखळीत अडकलेले शेतकरी शेवटी आयुष्यच संपवतात.

पीक नुकसान, राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँकांकडून किंवा परवानाधारक सावकारांकडून कर्ज फेडण्यास असमर्थता, वाढत्या कर्जामुळे झालेल्या शेतकरी आत्महत्या आर्थिक मदतीसाठी पात्र मानल्या जातात. अशा 1 लाख रुपये शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना दिले जातात. राज्यभरात आर्थिक भरपाईसाठी आम्हत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या 373 कुटुंबे पात्र असल्याचे आढळून आले. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी तर 200 कुटुंबांना अपात्र घोषित करण्यात आले, असे विधान परिषदेत शेतकरी आत्महत्यांबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले.

Farmer suicide 20 टक्क्यांची वाढ

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी पुन्हा पहिल्या क्रमांकावर बीड जिल्हा सर्वाधिक आत्महत्या नोंदवलेल्या जिल्ह्यांच्या यादीत आहे. तब्बल 126 शेतकऱ्यांनी जानेवारी ते जून 2025 दरम्यान बीडमध्ये आत्महत्या केली, तर ही संख्या मागील वर्षी याच कालावधीत101 होती. तर मराठवाड्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये जानेवारी ते जून 2025 आत्महत्या केल्या आहेत.

तब्बल 520 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर – 92,

नांदेड – 74,

परभणी – 64,

धाराशिव – 63,

लातूर – 38,

जालना – 32,

हिंगोली – 31

बीड – 126

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img