24.3 C
New York

Sharad Pawar : एका दिवसात शिक्षकांचा प्रश्न मार्गी लावा; आंदोलन स्थळावरून शरद पवारांची सरकारला तंबी

Published:

मुंबईतील आझाद मैदान येथे विनाअनुदानित शिक्षकांचं आंदोलन (Non Granted Teachers strike) सुरू आहे. अनुदानाच्या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. जो पर्यंत मागणी मान्य होत नाही. तो पर्यंत आझाद मैदान सोडणार नसल्याचा पवित्रा या शिक्षकांनी घेतला आहे. तसेच या आंदोलनामध्ये रात्रीपासून रोहित पवार सहभागी झाले आहेत. त्यानंतर आता शरद पवारांनी (Sharad Pawar) देखील या आंदोलनाला भेट दिली. यावेळी त्यांनी शिक्षकांसाठी जे करता येईल ते मी करील असं म्हणत शब्द दिला आहे.

Sharad Pawar काय म्हणाले शरद पवार?

या आंदोलक शिक्षकांशी पवारांनी संवाद साधला. तसेच ते म्हणाले की, विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं काम करणाऱ्या शिक्षकांना सन्मान मिळायला हवा. सरकारची तशीच भूमिका हवी. त्यांना सन्मानाने जगण्याची संधी मिळावी. एकदा 1980-81 साली असंचं एक आंदोलन शिक्षकांनी केले होते. त्यावेळी राज्यकर्त्यांनी बघ्याची भूमिका घेतली. त्यांची मागणी होती की, केंद्र सरकार जे देतं ते राज्याने द्यावं. ती मागणी मान्य झाली नाही. त्यानंतर राज्याची जबाबदारी माझ्याकडे आली. तेव्हा मी केंद्र सरकार जे देतं ते राज्याने द्यावं. ही शिक्षकांची मागणी मी मान्य केली.

मात्र आता त्याच राज्यामध्ये अनुदानासाठी शिक्षकांना संघर्ष करावा लागतो. या आंदोलनामध्ये देखील शिक्षकांच्या मागण्या महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे. पण ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांना संघर्ष करण्याची वेळ येऊ देऊ नये. शिक्षक हे शासनाचे अविभाज्य भाग आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्या न्याय्यहक्कांसाठी शिक्षकांच्या खांद्याला खांदा लावून सहकार्य करू. शिक्षकांसाठी जे करता येईल ते मी करेल. असा शब्द यावेळी शरद पवार यांनी शिक्षकांना दिला आहे. तसेच एका दिवसांत शिक्षकांचा प्रश्न मार्गी लावा. अशी तंबी पवार यांनी सरकारला दिली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img