सरकारी बंगला देशाचे सरन्यायाधीश म्हणून निवृत्त झालेले डी. वाय. चंद्रचूड ( Former CJI DY Chandrachud) यांनी अद्याप सोडलेला नाही. निवृत्त होऊन दीड वर्षे झाले आहेत. तरीडी चंद्रचूड यांनी बंगला सोडलेला नाही. तब्बल आठ महिन्यांपासून ते येथेच राहत आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) प्रशासनाने थेट केंद्र सरकारला पत्र लिहून बंगला खाली करण्यास सांगितले आहे. असा प्रकारचे पत्र लिहून हस्तक्षेप करण्याची सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात दुर्मिळ घटना आहे.
डी. वाय. चंद्रचूड हे देशाचे 50 वे सरन्यायाधीश होते. त्यांनी नोव्हेंबर 2022 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत कामकाज पाहिले आहे. पद सोडल्यानंतर जवळजवळ आठ महिने टाईप VIII बंगल्यामध्ये राहिले आहेत. त्यानंतरचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना हे मुख्य सरन्यायाधीशांच्या बंगल्यात राहिले नाहीत. तर विद्यमान भूषण आर. गवई हेही (B. R. Gavai) जुनाच वाटप झालेल्या बंगल्यात राहत आहेत. त्यांनी सरन्यायाधीशांसाठी असलेल्या बंगल्यामध्ये न जाण्याचा निर्णय घेतला आहे.
DY Chandrachud सहा महिन्यांचा कालावधी उलटला
सरन्यायाधीश निवृत्त झाल्यानंतर ते सहा महिनेच सरन्यायाधीशांच्या निवासस्थानी राहू शकतात. त्यानंतर तो बंगला खाली करावा लागतो. परंतु चंद्रचूड हे आठ महिन्यापासून त्या निवासस्थानी राहत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने प्रशासनाने 1 जुलै रोजी केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाला एक पत्र लिहिले आहे. माजी सरन्यायाधीश चंद्रचंडू यांनी कृष्णा मेनन मार्गावरील बंगला क्रमांक पाच विलंब न लावता खाली करावे, असे पत्र लिहिले आहे. याबाबत हिंदुस्थान टाइम्सने वृत्त दिले आहे.
DY Chandrachud संजीव खन्ना यांना विनंती करून चंद्रचूड बंगल्यात राहिले
निवृत्तीनंतर एक महिन्यानंतर न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी त्यांचे उत्तराधिकारी, तत्कालीन मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना यांना एक पत्र दिले होते. 5 कृष्णा मेनन मार्गावरील विद्यमान निवासस्थान 30 एप्रिल 2025 पर्यंत राहण्याची परवानगी मला दिली तर ते अधिक सोयीचे होईल, अशी विनंती चंद्रचूड यांनी संजीव खन्ना यांना केली होती. तत्कालीन सरन्यायाधीशांनी सहमती दर्शवल्यानंतर मंत्रालयाने मंजुरी दिल्यानंतर चंद्रचूड हे निवासस्थानी राहिले. त्यासाठी महिन्याला 5430 रुपये शुल्क भरायचे होते. तर निवृत्तीनंतर त्यांना तुघलक रोडवरील बंगला क्रमांक चौदा देण्यात आला होता. परंतु त्याची दुरुस्ती होऊ शकली नव्हती.
DY Chandrachud सरन्यायाधीशांच्या दोन्ही मुलींना गंभीर आजार
माजी न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी याबाबत उत्तर दिले आहे. माझ्या दोन्ही मुलींना गंभीर आजार आहेत. नेमालाइन मायोपॅथी हा गंभीर आजार दोघींना आहे. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार करत आहेत. त्यामुळे हा बंगला खाली करण्यात आला नाही, असे चंद्रचुड यांनी स्पष्ट केले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या प्रशासनाला कळविण्यात आलेले आहे, असे चंद्रचूड यांचे म्हणणे आहे.