इंग्लंडविरुद्ध सुरु असणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालने इतिहास रचला आहे. माजी कर्णधार राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) यांचीत्याने बरोबरी केली आहे. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि विराट कोहलीला (Virat Kohli) देखील तर यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) मागे टाकले आहे. इंग्लंडविरुद्ध सुरु (INDvsENG) असणाऱ्या मालिकेत सध्या यशस्वी जयस्वाल जबरदस्त फॉमात असून पहिल्या कसोटी सामन्यात त्याने शानदार शतक झळकावला होता.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात 2 हजार धावा करणारा यशस्वी जयस्वालने संयुक्तपणे भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने माजी भारतीय कर्णधार राहुल द्रविड आणि विरेंद्र सेहवाग यांची बरोबरी केली आहे तर सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीला मागे टाकले आहे. जयस्वालने एजबॅस्टन कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात 10 वा धावा काढताना ही कामगिरी केली. तो 28 धावा करुन या सामन्याच्या दुसऱ्या डावात बाद झाला तर पहिल्या डावात त्याने शानदार 87 धावांची खेळी केली होती.
कसोटी क्रिकेटमध्ये 40 व्या डावात जयस्वालने 2000 धावा पूर्ण केल्या. यापूर्वी 40 डावात 2000 धावा राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवागनेही पूर्ण केल्या. जयस्वालने 21 कसोटी सामन्यांच्या 40 डावात 53.10 च्या सरासरीने 2018 धावा केल्या आहेत. यामध्ये 5 शतके आणि 11 अर्धशतके समाविष्ट आहेत. न्यूझीलंडविरुद्ध हॅमिल्टनमध्ये द्रविडने 1999 मध्ये आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध वीरेंद्र सेहवागने 2004 मध्ये चेन्नईमध्ये ही कामगिरी केली.
तर विजय हजारे आणि गौतम गंभीर यांनी 43 डावांमध्ये 2000 धावा पूर्ण केल्या होत्या तर विराट कोहलीने 53 डावांमध्ये दोन हजार धावा पूर्ण केल्या होत्या. यशस्वी जयस्वाल सर्वात कमी वयात दोन हजार धावा पूर्ण करणारा दुसरा भारतीय फलंदाज बनला आहे. ही कामगिरी त्याने 23 वर्षे 188 दिवसांच्या वयात केली. तर 20 वर्षे 330 दिवसांत सचिन तेंडुलकरने कसोटी क्रिकेटमध्ये दोन हजार धावा पूर्ण केल्या होत्या.