राज्य सरकारने त्रिभाषा सूत्रीत हिंदी भाषाच्या सक्तीचा निर्णय सरकारने मागे घेतल्यानंतर आज दोन्ही ठाकरे बंधूंकडून विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. एकत्र विजयी मेळावा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा होता आहे. मुंबईतील वरळी परिसरातील डोम सभागृहात आज ५ जुलै २०२५ रोजी हा मेळावा पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीसांना यावेळी राज ठाकरेंनी जोरदार टोला लगावला.
आजचा मेळावा शिवतिर्थावर मैदानात व्हायला हवा होता. मैदान ओसंडून वाहिलं असतं. पाऊस आहे. त्यामुळे मुंबईत जागा मिळत नाही. बाहेर उभे आहेत. त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आता स्क्रिनवर आटपा. मी माझ्या मुलाखतीत म्हटलं होतं. त्यातून या गोष्टी सुरू झाल्या,. कोणत्याही वादापेक्षा आणि कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, असं मी म्हटलं होतं. २० वर्षानंतर उद्धव आणि मी एका मंचावर येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही आम्हा दोघांना एकत्र आणण्याचं ते देवेंद्र फडणवीस यांना जमलं, असे राज ठाकरे म्हणाले.
Raj Thackeray आम्हा दोघांना एकत्र आणण्याचं ते देवेंद्र फडणवीस यांना जमलं
“मी माझ्या मुलाखतीत म्हटलं होतं, त्यातूनच या गोष्टी सुरू झाल्या. कोणत्याही वादापेक्षा आणि कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, असं मी म्हटलं होतं. तब्बल २० वर्षांनंतर उद्धव आणि मी एका मंचावर येत आहोत. जे बाळासाहेबांनाही जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हा दोघांना एकत्र आणण्याचं ते देवेंद्र फडणवीस यांना जमलं.” असे राज ठाकरे म्हणाले.
Raj Thackeray महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने कुणी पाहायचं नाही
आता सर्वच चॅनेलचे कॅमेरे इकडे लागले तिकडे लागले. आता संध्याकाळी सगळं सुरू होईल. काय वाटतं काय, दोघांची बॉडी लँग्वेज कशी होती. कोणी कमी हसलं का. बोलतायत का. आपल्याकडे इतर विषय सोडून इतर गोष्टीत रस असतो अनेकांना. आजचा हा मेळावा. मोर्चालाही तीच घोषणा होती. आताही तिच आहे. कोणताही झेंडा नाही. मराठी हाच अजेंडा. माझ्या मराठीकडे, महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने कुणी पाहायचं नाही, असा इशारा राज ठाकरेंनी दिला.