“मी पुण्याच्या भूमीत उभा आहे. सर्वात आधी ज्यांनी गुलामीच्या काळरात्री आशेचा किरण दाखवला, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, शिवाजी महाराजांना मी प्रणाम करतो. पुण्याची भूमी एक प्रकारे स्वराज्याच्या संस्काराची उगमस्थान आहे. 17 व्या शतकात या ठिकाणाहून स्वराज्याचा आलेख, तंजावूरपासून अटक ते अटक पासून कटक पर्यंत आला” असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. थोरले बाजीराव पेशवे यांचा, खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथे भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. त्याच्या अनावरणाप्रसंगी ते बोलत होते.
अमित शाह पुढे म्हणाले, सतराव्या शतकात येथून स्वराज्याची ज्योत पेटली होती. इंग्रजांसमोर पुन्हा एकदा लढण्याची वेळ आली त्यावेळी पहिली गर्जना लोकमान्य टिळकांनी केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी महाराष्ट्राच्या भूमीतूनच असे उदाहरण दिले की एक व्यक्ती आपल्या जीवनात देशासाठी काय करु शकतो हे दाखवून दिले. पेशवा बाजीरावांचे अनेक पुतळे देशभरात आहेत. माझ्या गावातही आहे. पण त्यांचं स्मारक बनवण्याची जागा पुण्यातील एनडीएतच आहे.
“बाजीरावांचे पुतळे देशभरात आहेत. माझ्या गावात आहे. पण स्मारक बनवण्याची योग्य जागा ही एनडीएच आहे” असं अमित शाह म्हणाले. “श्रीमंत बाजीरावांच्या मूर्तीपासून प्रेरणा घेऊन त्यांच्या जीवनाचा अभ्यास करावा. मला वाटतं अनेक वर्ष भारताच्या सीमेला स्पर्श करण्याची कोणी हिंमत करणार नाही” असं अमित शाह म्हणाले.
Amit Shah ‘युद्धात व्यूहरचनेचं महत्त्व’
“काल काही पत्रकार मित्रांसोबत चर्चा केली. त्यांनी सांगितलं की, अमित भाई, तुम्ही पुण्यात एका स्पेशल कार्यक्रमासाठी जात आहात. आजच्या युद्धाची पद्धती आणि बाजीराव पेशवाच्या काळातील युद्धाची पद्धती यात काय साम्य असेल. असं विचारलं. मी त्यांना सांगितलं, युद्धाचे काही नियम कालबहाय्य होत नाही. युद्धात व्यूहरचनेचं महत्त्व, त्वरेचं महत्त्व, समर्पणाचा भाव, देशभक्तीचा भाव आणि सर्वात मोठी गोष्ट युद्धात बलिदानाचा भाव हाच सैन्याला विजय मिळवून देतो. हत्यारं बदलत असतात.