26.7 C
New York

Devendra Fadnavis : तरुणांपर्यंत इतिहास पोहचवणार; मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही

Published:

आज पुण्यातील एनडीए परिसरात थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या हस्ते अनावरण झाले आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, थोरले बाजीराव यांचा देशाच्या अतिशय नामंकित प्रबोधिनीमध्ये पुतळा स्थापित होत आहे.

ज्या काळामध्ये छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची ज्योत पेटवली होती त्या काळामध्ये संपूर्ण भारतामध्ये एकप्रकारे परकीय आक्रमकांना स्वीकारण्यात आले होते अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण या काळात देखील छत्रपती शिवरायांनी एक फौज तयार केली आणि स्वराज्याची स्थापना केली. महाराजांनंतर थोरले बाजीराव यांचा इतिहास छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याला आणि साम्राज्याला विस्तारित करणारा आहे.

थोरले बाजीराव यांनी वयाच्या 19 व्या- 20 व्या वर्षी पंतप्रधान पदाची सुत्र हातात घेतली आणि 21 वर्ष लढत राहिले. 41 लढ्यात एकही लढाईत ते पराजित नाही. त्यांनी दक्षिण, उत्तरमध्ये साम्राज्याचा विस्तार केला असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. थोरल्या बाजीरावांच्या लढाईत वेग ही रणनीती असायची असं देखील फडणवीस म्हणाले. त्यांची सैन्या 80 किलोमीटर एका दिवसात प्रवास करत होती त्यामुळे लढाईत वेग त्यांची रणनीती होती मात्र इंग्रजांनी आपला इतिहास डिलीट केला आहे पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपल्या नायकांचा इतिहास तरुणांपर्यंत पोहचवण्याचा काम आम्ही करणार असल्याची ग्वाही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img