केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आज पुण्यात आहेत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथे थोरले बाजीराव पेशवे यांचाखडकवासला येथील भव्य पुतळा उभारण्यात आलाय. ते या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणासह अन्य कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. थोरले बाजीराव पेशवे यांचा, खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथे भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. या कार्यक्रमांना अमित शाह यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. त्याच्या अनावरणासह प्रशिक्षणार्थी कॅडेट आणि सैन्यातील अधिकाऱ्यांबरोबर शाह संवाद साधणार आहेत.
तसेच कोंढवा बुद्रुक येथे जयराज स्पोर्ट्स आणि कन्व्हेन्शन सेंटरलाही ते भेट देणार असून, शहा यांच्याकडून शुक्रवारी बाळासाहेब देवरस रुग्णालयाची पाहणी करण्यात येणार आहे. पीएमएचआरसी हेल्थ सिटीच्या भूमिपूजन समारंभासही शाह उपस्थित राहणार आहेत. येरवड्यातील हॉटेलमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यातील मुक्कामी आहेत. अमित शाहंच्या दौऱ्यानिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
Amit Shah पुण्यात वाहतूक मार्गात काय बदल केलेत?
अमित शाह यांच्या दौऱ्यानिमित्त पुणे शहरातील काही भागात वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मंतरवाडी फाटा खडीमशीन चौक ते कात्रज चौक यादरम्यान सर्व मालवाहतूक करणाऱ्या जड अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. बंडगार्डन वाहतूक विभागातील मोर ओढा सर्किट हाऊस चौक ते आयबी चौक दरम्यानचे वाहतूक एकरी आवश्यकतेनुसार सूत्रपा करण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी दिलीय.