30.7 C
New York

Otur News : सायकल भेट देताच “तिच्या” डोळ्यातून वाहिले आनंदाश्रू

Published:

ओतूर, (Otur News) प्रतिनिधी:दि.३ जूलै ( रमेश तांबे )

चैतन्य विद्यालयात इयत्ता दहावी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी आरती राजेंद्र जाधव या विद्यार्थिनीची घरची परिस्थिती गरिबीची आई वडील दोघेही शेतमजूर ओतूर पासून सात किलोमीटर अंतरावर तेलदरा येथे राहत असून, रोज सात किलोमीटर पायी यायचे आणि जायचे असाच तिचा शिक्षणासाठी दैनंदिन पायपीट करण्याचा दिनक्रम विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक भाऊसाहेब खाडे यांना ही गोष्ट समजली… त्यांनी संघर्ष सोशल फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला.आणि पाच सहा महिन्यानंतर आज संघर्ष सोशल फाउंडेशन चे सर्व कार्यकर्ते चक्क शाळेमध्ये सायकल घेऊन आले.आरती जाधवला जेव्हा सायकल  भेट देण्यात आली तेव्हा तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले.सर्वजण क्षणभर स्तंभित झाले.आरतीचा आनंद गगनात मावेनासा झाला.

संघर्ष सोशल फाउंडेशन ही ओतूर येथे चैतन्य विद्यालयाच्याच माजी विद्यार्थ्यांनी स्थापित केलेली एक सामाजिक संघटना आहे. ह.भ. प. सुशील महाराज जाधव यांनी आणि त्यांच्या मित्र परिवाराने ही संघटना स्थापन केली आहे. समाजातील वंचित, शिक्षणापासून दूर गेलेल्या, किंबहुना गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना ही संस्था नेहमीच मदत करत आलेली आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी सुद्धा अशीच एक सायकल त्यांनी एका गरीब विद्यार्थिनीला भेट दिली होती. आरती जाधव ही दहावी मध्ये शिकत असलेली आदिवासी समाजाची विद्यार्थिनी आहे. शाळेच्या कबड्डी संघात सुद्धा ती उत्कृष्ट रायडर आहे. त्यामुळे भविष्यात तिला पोलीस खात्यामध्ये जाण्याची इच्छा आहे. परंतु तेलदरा ते ओतूर हे अंतर प्रचंड असल्यामुळे तिची पायपीट असायची. तिला अभ्यासाला वेळ कमी मिळायचा. तिची ही घालमेल खाडे सरांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी संस्थेचे सेक्रेटरी प्रदीप गाढवे व सहसचिव पंकज घोलप त्याचप्रमाणे मुख्याध्यापिका राजश्री भालेकर यांच्या माध्यमातून सुशील महाराज जाधव यांच्याशी संपर्क केला. मुलीची आर्थिक परिस्थिती त्यांना समजावून सांगितली आणि तिला जर सायकल मिळून दिली तर तिचा जाण्या येण्याचा वेळ वाचेल आणि तो वेळ ती अभ्यासासाठी देऊ शकेल, असा विश्वास त्यांना दिला. लागलीच संघर्ष सोशल फाउंडेशन चे जाधव महाराजांसह प्रणव तांबे ,नकुल चव्हाण, कुणाल कर्डिले, ॲड.कल्याणी पन्हाळे, प्रा. दर्शना शाह, गौरव गाढवे, शार्दुल डुंबरे, प्रथमेश गाडेकर यांनी संस्थेच्या माध्यमातून सायकल खरेदी करून, विद्यालयात येऊन ही सायकल आरती जाधव हिस सुपूर्द करण्यात आली. यावेळी सुशील जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. भाऊसाहेब खाडे यांनी सर्वांचे स्वागत केले. आरतीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून संघर्ष सोशल फाउंडेशन च्या सर्व कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img