ओतूर,(Otur News) प्रतिनिधी:दि.३ जूलै ( रमेश तांबे )
येथील ओतूर सायकल ग्रुपच्या सायकल स्वारांनी ओतूर पंढरपूर हा सायकल प्रवास अगदी दीड दिवसात पूर्ण करून, या वारीद्वारे पर्यावरणाचा संदेश दिला.
ओतूर सायकल ग्रुपचे हे चौथे वर्ष असून एकूण या सायकलवारीत ३५ सायकल पट्टूंनी सहभाग नोंदवला.
पहाटे तीन वाजता या सायकल स्वरांनी ओतूरवरून प्रवासास सुरुवात केली आणि नारायणगाव कवठे यमाई रांजणगाव गणपती न्हावरे मार्गे इंदापूर सरडेवाडी येथे पहिला मुक्काम केला. जवळजवळ पहिल्या टप्प्यात २२० किलोमीटरचा पल्ला या सर्वांनी पूर्ण केला. दुसऱ्या दिवशी राहिलेला ६० किलोमीटरचा प्रवास करून पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी मस्तक ठेवण्यासाठी हे सायकल स्वार पोहोचले. जाताना ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात सायकल पटूंचे जंगी स्वागत करण्यात आले. या सायकल ग्रुपमध्ये १५ ते ७० वयापर्यंतचे सायकलपटू सहभागी झाले होते.सायकलवारीत महिला सायकलपटूंचा सुद्धा समावेश यामध्ये होता.या सर्व सायकलपटूंना ज्येष्ठ सायकलपटू आणि गोवा कोल्हापूर येथे ट्रायथलोन स्पर्धेतील विजेते अशोक जगदाळे यांनी टी-शर्ट दिले. धोलवड गावचे युवा सामाजिक कार्यकर्ते रोहित मुंढे यांनी सर्वांना सन्मानचिन्हे दिली. न्हावरे या ठिकाणी चंद्रकांत साठे,उपसरपंच शरद पवार, चेअरमन सुभाष कांडगे, सचिन वेताळ तसेच किसन मुंडे, संजय नलावडे तसेच दौंड येथे प्राचार्य डॉक्टर विकास शेलार, सचिन जयसिंग तांबे या सर्वांनी वारीचे स्वागत केले व नाश्त्याची व्यवस्था केली. माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पंढरपूर येथील सायकल वारीचे स्वागत केले. इंदापूर सरडेवाडी येथील आबा पाटील यांनी त्यांच्या स्वामीराज हॉटेल वर सर्वांची मुक्कामाची व्यवस्था केली होती.ही सायकल वारी ओतूरला आल्यानंतर सर्व सदस्यांना एका शानदार समारंभात ट्रॉफी व मेडल देण्यात आली. जुन्नर टुरिझम हेल्प डेस्क, दुर्ग वाचन व दुर्ग संवर्धन.. ‘झाडोबा संकल्प वृक्ष संवर्धनाचा’ यांचे वतीने प्रत्येकाला वडाचे रोप देऊन वृक्ष संवर्धनाचा संकल्प करण्यात आला.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मोहित ढमाले,भानूविलास गाढवे, ओतूरच्या सरपंच डॉ.छाया तांबे, उपसरपंच प्रशांत डुंबरे, ग्रामविकास मंडळाचे सेक्रेटरी प्रदीप गाढवे, सहसचिव पंकज घोलप,संतोष डुंबरे, सेवानिवृत्त उपप्राचार्य डॉ. सुंदरराव ढाकणे, ओतूर सायकल ग्रुप चे अध्यक्ष जयसिंग डुंबरे, मीरा भोर, मारूती घाडगे, विलास तांबे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप गाढवे यांनी केले.भाऊसाहेब खाडे यांनी सूत्रसंचालन केले तर गणेश डुंबरे यांनी आभार मानले.