मुंबईमध्ये गौतम अदानी यांच्याकडून धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत धारावी या जगातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीच्या जागेवर उद्योगपती पन्नास हजार घर बांधली जाणार आहेत. यावरून मात्र सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. मुंबईतील डम्पिंग ग्राउंडच्या जागेवरून देखील या प्रकल्पासाठी वाद निर्माण झाला आहे. त्यावर सरकारमधील भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेना या पक्षांना काँग्रेसचे नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी धारेवर धरल्याचे पाहायला मिळालं.
Nana Patole काय म्हणाले नाना पटोले?
धारावी पुनर्विकास प्रकल्पात जे लोक अपात्र ठरणार आहेत. त्यांना रेंटल हाऊसिंगमध्ये ठेवले जाणार आहे. अदानी त्यासाठी ५० हजार घरे धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड बांधणार आहे. यासाठी देवनार डंपिंग ग्राऊंडची जागा देण्यात आली.
मुंबई महानगर पालिकेने मात्र 185 लाख मेट्रिक टन कचरा साफ करुन द्यायचा आहे. महापालिकेला त्यासाठी 2368 कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. हे टेंडर तीन वर्षांसाठी काढण्यात आले आहे.23 हजार मेट्रिक टन कचरा रोज उचलायचा आहे. हे आतापर्यंतचे सर्वात मोठे घनकचरा व्यवस्थापनातील टेंडर आहे. महापालिका हा खर्च करणार आहे.
हे सर्व दिल्लीतून होत आहे. दिल्लीतील ए गँगसाठी होत आहे. दिल्लीत यांचा आका बसल्या आहेत. मंत्रिमंडळातील गंगवार कचरा खाण्यासाठी सुरू आहे. दिल्ली सांगेल तसा हे सरकार करत आहे. याचे कॉन्ट्रॅक्ट एकनाथ शिंदे यांच्या माणसाने दिले. महापालिका ही काम करत असल्याने मुंबईकरावर आर्थिक कर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.