31.2 C
New York

Gang Rape In Kolkata : पॅनिक अटॅक आलेल्या तरुणीवर इनहेलर देऊन सामूहिक बलात्कार

Published:

कोलकात्यातील विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संपूर्ण देशातून हे प्रकरण समोर आल्यानंतर संताप व्यक्त केला जातोय. (Gang Rape In Kolkata) मिळालेल्या माहितीनुसार लॉ कॉलेजच्या या 24 वर्षीय पीडित विद्यार्थिनीवर एकूण तिघांनी सामूहिक अत्याचार केला आहे. पीडित महिलेला अत्याचारादरम्यान पॅनिक अटॅक आला होता. मात्र, या पीडितेवर इनहेलर देऊन पुन्हा अत्याचार करण्यात आला आहे.

ही अमानवी घटना घडल्यानंतर पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनीही तपास चालू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित विद्यार्थिनीवर 25 जूनच्या रात्री 7.30 ते 10.30 वाजेर्यंत हे कुकृत्य करण्यात आलंय. पीडित विद्यार्थिनीने तिच्यासोबत नेमकं काय घडलं? याती आपबीती सांगितली आहे. तक्रारीनुसार पीडितेला आपल्यासोबत काहीतरी अघटीत घडणार याची कल्पना आली होती. त्यानंतर तिला पॅनिक अटॅक आला.

परंतु, या सामूहिक बलात्कार प्रकरणातील प्रमुख आरोपी मनोजित मिश्रा याने आपल्या साथीरादारंना इनहेलर आणायला सांगितले. त्यानंतर हे इनहेलर पीडित विद्यार्थिनीला देण्यात आले. इनहेलरमुळे विद्यार्थिनीला बरे वाटले. तिला श्वास घेता येई लागला. संधी मिळताच तिने त्या नराधमांच्या तावडीतून सुटण्यासाठी पळ काढला. मात्र, महाविद्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद होते. त्यामुळे पीडित विद्यार्थिनी काहीच करू शकली नाही.

या गोष्टीचा फायदा घेत तिन्ही आरोपींनी पीडित विद्यार्थिनीला जबरदस्तीने सुरक्षा रक्षकांच्या रुममध्ये नेलं. तिथे आरोपींनी विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार केले. विशेष म्हणजे मुख्य आरोपी मनोजित मिश्रा हा विद्यार्थिनीवर अत्याचार करत असताना अन्य दोन आरोपी फोनमध्ये रेकॉर्डिंग करत होते. येथील आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयात महिला डॉक्टरवर बलात्काराचा असाच धक्कादायक प्रकार घडला होता. सामूहिक अत्याचार त्यानंतर आता कोलकात्यातील लॉ कॉलेजमध्येच एका विद्यार्थिनीवर करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img