विधानसभेच पावसाळी अधिवेशन सुरु आहे. काँग्रेस नेते आणि विदर्भातील आमदार नाना पटोले (Nana Patole) यांचं आज सभागृहात आक्रमक वर्तन पहायला मिळालं. नाना पटोले हे विधानसभा अध्यक्षांच्या आसनासमोर धावून गेले. महाविकास आघाडीच्या आमदारांनी भाजप आमदार बबनराव लोणीकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवरसरकारने माफी मागावी अशी मागणी केलेली. या दरम्यान नाना पटोले आक्रमक झाले. विधानसभा अध्यक्षांच्याजवळ गेले. त्यामुळे त्यांना दिवसभरासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निलंबित केलं आहे. आमदार रोहित पवार यांनी ही माहिती दिली.
यानंतर मु्ख्यमंत्र्यांनी पटोलेंनी माफी मागावी असे सांगितले. मात्र गदारोळ वाढत असल्याचे लक्षात येताच विधानसभा अध्यक्षांनी पटोले यांना एक दिवसासाठी निलंबित करण्यात येत असल्याचे जाहीर केले. दरम्यान, यानंतर विरोधकांनी थेट सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मला नियम माहिती आहेत मी अध्यक्षांचा अपमान केलेला नाही, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली. सुरु आहे