आझाद मैदानावर हजारों आशा सेविकांचे मानधन न मिळाल्याच्या विरोधात (Asha Sevika Andolan) आंदोलन सुरु केले आहे. बेमुदत कामबंद आंदोलन मुंबई महानगरपालिकेअंतर्गत कार्यरत असलेल्या आशा सेविकांनी करण्याचा निर्णय घेतला असून विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. आशा सेविकांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ४५ दिवस आंदोलन केले होते. शिंदे सरकारनेत्यावेळी मागण्या पूर्ण करू असे आश्वासन दिले होते पण अजूनही मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत असा आरोप आशा सेविकांनी केला आहे.
अशा सेविकांनी २९ जुलै २०२४ रोजी घेण्यात आलेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी अशी मणी केली आहे. सेवानिवृत्त (Retired) आरोग्यसेविकांच्या जागी आशा सेविकांची नियुक्ती, ओळखपत्र (Identity card,), नियुक्तीपत्र (Appointment letter)किमान वेतन लागू करणे, दर महिन्याच्या १ तारखेला पगार (Salary) देणे, आणि stationery व अप्रॉन उपलब्ध करून देणे यांसारख्या मागण्या लावून धरल्या आहेत. खास मानधनाविना कोणत्याही अतिरिक्त कामासाठी आदेश लादू नयेत,या मागणीचाही समावेश आहे. सेविकांनी आंदोलन मागण्या मान्य होईपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
Asha Sevika Andolan आशा सेविकांच्या मागण्या कोणत्या ?
- आशा सेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा
- आशा सेविकांना नोव्हेंबर २०२४ पासून मानधन मिळालं नाही ते देखील देण्यात यावे
- दर महिन्याच्या दहा तारखेला आशा सेविकांचा पगार अदा करणे
- अंगणवाडी सेविकेप्रमाणे आशा सेविकांना बोनस देण्यात यावा
- 29 जुलै 2024 रोजी झालेल्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करणे
- महापालिका आशासेविकांना पूर्वलक्षी प्रभावाने किमान वेतन देणे
- महापालिकेच्या आशासेविकांना सेवानिवृत्त झालेल्या आरोग्य सेविकांच्या रिक्त जागेवर आरोग्यसेविका म्हणून नियुक्त करणे
- ओळखपत्र आणि नियुक्तीपत्र
- स्टेशनरी अप्रॉन देणे
- कोणत्याही कामासाठी अतिरिक्त मानधन मिळण्यासंदर्भात निर्णय लादू नये