23.5 C
New York

Rohit Pawar : कर्जमाफीचं आश्वासन, पण अंमलबजावणी शून्य!रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

Published:

आज राष्ट्रीय कृषी दिन (Farmers Loan Waiver) आहे, पण सत्ताधारी सरकार शेतकऱ्यांप्रती आपली जबाबदारी विसरलं आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली आहे. ते म्हणाले, सरकारने अनेक आश्वासने दिली, पण एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यांच्याशी काही देणं-घेणं या सरकारला (Mahayuti Goverment) उरलेलं नाही.

Rohit Pawar कर्जमाफीचं आश्वासन, पण अंमलबजावणी शून्य!

रोहित पवारांनी यावेळी शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा जोरात उपस्थित केला. ते म्हणाले, कर्जमाफीचा विषय दोन वेळा विधानसभेत मांडला होता. मुख्यमंत्री म्हणाले होते की शेतकऱ्यांकडून सिबिल स्कोअर विचारू नका. पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना सिबिल स्कोअरच्या कारणाने कर्ज मिळत नाही. त्यांना सावकाराच्या दारात जावं लागतं. बच्चू कडूंनी आंदोलन केलं, तेव्हा आम्ही तिकडे गेलो आणि ही वस्तुस्थिती समजली.

Rohit Pawar फक्त आकडेमोड नको…

सरकारने नुकत्याच 85 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. पण त्याऐवजी 25 हजार कोटी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वापरा. ही मागणी आम्ही सातत्याने करत आहोत. पण सरकार लक्ष देत नाही. त्याचबरोबर रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत म्हटलं, फडणवीस विरोधी पक्षनेते असताना पुरवणी मागण्या रोखून धरायचे. आता मात्र फक्त पैसे उडवण्याचं काम सुरू आहे.

आज कृषी दिन असूनही, सरकारची भूमिका फक्त दिखाऊ असल्याचं रोहित पवारांनी म्हटलं. माजी मंत्री शंकरराव कोकाटे यांचा आवाज आता ऐकायला मिळत नाही. जर ते आज शेतकऱ्यांसाठी बोलले, तर त्यांचं भाषणही कापलं जातं का हे पाहावं लागेल, असं म्हणत त्यांनी सरकारमधील अंतर्गत दबावांवरही संकेत दिले.

कर्जमाफीवरून सरकारला धारेवर धरताना रोहित पवारांनी सत्ताधारी गटांतील हालचालींचाही उल्लेख केला. प्रत्येक ठिकाणी जिथे अजित पवार गटाचा आमदार आहे, तिथे शिंदे गट प्रवेश घेत आहे. जिथे शिंदे गटाचे आमदार आहेत, तिथे अजित पवार गटाकडून इनिंग सुरू होत आहे. 2029 मध्ये काय चित्र असेल, हे आताच स्पष्ट होतंय.

Rohit Pawar कुणाल पाटलांच्या मतदारसंघात हालचाल?

त्याचबरोबर रोहित पवारांनी संकेत दिले की, कुणाल पाटलांच्या मतदारसंघात किंवा त्यांच्या संस्थेच्या कामकाजावर काही घडलं आहे. त्यामुळेच त्यांची हालचाल दिसून येते आहे, अशी चर्चा सध्या सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केलं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img