23.3 C
New York

Mahendra Singh Dhoni : आता ‘कॅप्टन कूल’ फक्त धोनीच! ट्रेडमार्कसाठी एमएस धोनीचा अर्ज दाखल

Published:

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) क्रिकेटविश्वात कॅप्टन कूल या नावाने ओळखला जातो. आता हे नाव त्याला कुणी दिलं हा संशोधनाचा विषय ठरावा. मात्र याच नावाला आता कायदेशीर अधिष्ठान मिळणार आहे. ही गोष्ट तुम्हाला आता कदाचित खरी वाटणार नाही. पण हेच खरं आहे. “कॅप्टन कूल” या (Captain Cool) नावासाठी ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन अर्ज स्वतः धोनीनेच दाखल केला होता. त्याचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे.

ट्रेडमार्क्स रजिस्टर पोर्टलवरील माहितीनुसार अर्जाची सध्याची स्थिती स्वीकृत आहे. 16 जून रोजी अधिकृत ट्रेडमार्क जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला होता. धोनीने 5 जून रोजी कॅप्टन कूल नावाच्या ट्रेडमार्कसाठी अर्ज दाखल केला होता. प्रस्तावित ट्रेडमार्क क्रीडा प्रशिक्षण, प्रशिक्षणासाठी विविध सुविधा, प्रशिक्षण आणि अन्य सेवा देण्यासाठीच्या श्रेणीअंतर्गत नोंदणीकृत आहे.

Mahendra Singh Dhoni 2020 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती

धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 2020 मध्येच निवृत्ती जाहीर केली होती. आता या घटनेला पाच वर्षे उलटली आहेत. धोनीने शेवटचा सामना 2019 मधील विश्वचषक स्पर्धेत खेळला होता. या सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला होता. या पराभवाबरोबरच स्पर्धेतूनही बाहेर पडावं लागलं होतं. यानंतर धोनीने कोणताच सामना खेळला नाही. महेंद्र सिंह धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी नंतर निवृत्ती जाहीर केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img