जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी गुडन्यूज मिळाली आहे. कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा एकदा (LPG Price) तेल कंपन्यांनी कपात केली आहे. 19 किलो गॅस टाकीच्या दरात 58.50 रुपयांनी कपात केली आहे. गॅसचे नवीन दर आजपासून लागू झाले आहेत. व्यावसायिक गॅस सिलिंडर आता 1665 रुपयांना राजधानी नवी दिल्लीत (New Delhi) मिळणार आहे. या दरकपातीमुळे हॉटेल व्यावसायिक, ढाबा आणि अन्य व्यावसायिक संस्थांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे खाद्य पदार्थांच्या किंमती कमी होण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे.
तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस दरांचा आढावा घेतात. आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किंमती, रुपयाची स्थिती आणि अन्य बाजार परिस्थितीच्या आधारावर किंमतीत घट किंवा वाढ केली जाते. मे महिन्यातही व्यावसायिक गॅसच्या दरात कपात झाली होती. सलग तीन महिन्यांत गॅसच्या दरात कपात झाली आहे. याचा फायदा हॉटेल, रेस्टॉरंट आणि अन्य व्यावसायिक कारणांसाठी गॅस घेणाऱ्या विक्रेत्यांना होणार आहे.
दरम्यान, याआधी जून महिन्यातही दर कपात झाली होती. त्यावेळी 24 रुपयांनी दर कमी झाले होते. त्यानंतर जुलै महिन्यातही तेल कंपन्यांनीही दर कमी केले आहेत. याचा फायदा लहान व्यावसायिकांना जास्त होणार आहे. गॅससाठी त्यांना कमी पैसे मोजावे लागतील. सध्याच्या परिस्थितीत गॅसच्या किंमती बाजारातील चढ उतारावर अवलंबून आहेत. त्यामुळे यात सातत्याने बदल होत असतात.
LPG Price घरगुती गॅसच्या दरात वाढ नाही
या दरवाढीतून घरगुती गॅसधारकांना दिलासा मिळाला आहे. या गॅसच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. काही महिन्यांपासून घरगुती गॅसच्या दरात वाढ झालेली नाही. मागील महिन्यातील दरावरच 14.2 किलो घरगुती एलपीजी सिलिंडर मिळत आहे. दिल्लीत 803 रुपये, कोलकात्यात 829 रुपये, मुंबईत 802.50 रुपये तर चेन्नई 818.50 रुपये या दरांत घरगुती गॅस मिळत आहे.