राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सौनिक या जून महिन्याच्या अखेरीस सेवानिवृत्त होत असल्याने मंत्रालय प्रशासनाला नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीचे वेध लागले होते. Maharashtra Chief Secretary अखेर त्याची प्रतीक्षा संपली असून राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी कार्यरत असलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी राजेशकुमार मीना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आपला पदभार ते सोमवारी (30 जून) सांभाळणार आहेत. मुख्य सचिव हे राज्यातील सर्वोच्च आयएएस पद आहे.
महाराष्ट्रला नवे मुख्य सचिव मिळाले आहेत. १९८८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी राजेशकुमार मीणा यांची या पदावर नियुक्ती झाली आहे. आपला कार्यभार आज दुपारी चार वाजता तेस्वीकारणार आहेत. सुजाता सैनिक या राज्याच्या पहिल्या मुख्य सचिव होत्या. त्यांच्या निवृत्तीनंतर सचिवपदासाठी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगरानी,गृह विभागाचे अपर सचिव इक्बालसिंग चहल यांचे नाव चर्चेत होते. मात्र, सेवा ज्येष्ठतेचा विचार करत राजेशकुमार मीना यांना संधी मिळाली आहे. ते 1988 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
राजेशकुमार मीणा यांनी यापूर्वी महसूल विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिलेय. राज्याच्या विकास प्रकल्पांना राजेशकुमार यांच्या अनुभवाचा फायदा होईल, अशी अपेक्षा अधिकारी वर्गातून केली जात आहे. याशिवाय, त्यांच्या नियुक्तीमुळे नवीन दिशा महाराष्ट्रातील प्रशासकीय कामकाजाला मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
राजेशकुमार, 1988 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांना प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे. त्यांनी विविध विभागामध्ये काम केले आहे. ग्रामीण विकास विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून राजेशकुमार यांनी यापूर्वीकाम केले आहे आणि आता ते महसूल आणि वन विभागात कार्यरत होते. त्यांच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्र प्रशासनात स्थिरता आणि सातत्य राखण्याची अपेक्षा आहे.