उत्तर महाराष्ट्रात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. भाजपमध्ये कारण या दोनही पक्षांचे माजी आमदार आता प्रवेश करणार आहेत.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. कोण आहेत हे आमदार? त्यांचा पक्षप्रवेश कधी होणार जाणून घ्या…
Ajit Pawar ‘हे’ दोन माजी आमदार भाजपमध्ये जाणार
उत्तर महाराष्ट्रातील दोन माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यामध्ये धुळ्याचे कॉंग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील आणि नाशिकचे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे माजी आमदार अपूर्व हिरे हे देखील भाजपमध्ये जाणार आहेत. उद्या हा पक्ष प्रवेश 1 जुलै 2025 रोजी पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना आता वेग आलेला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी दुसरीकडे राज्यात राज्यातील सर्वच पक्ष कामाला लागलेले आहेत. त्यात अद्याप स्वतंत्र लढणार की, युती आणि आघाडी होणार हे देखईल स्पष्ट झालेलं नसल्याने अशा पक्षप्रवेशांचा धडाका भाजपसह इतर पक्षांनी देखील लावल्याचं पाहायला मिळत आहे.