भारतात युपीआय पेमेंटपासून (UPI Payments) ते रेल्वेच्या तिकीटांपर्यंत (Train Ticket Booking) 1 जुलैपासून मोठ्य प्रमाणात बदल होणार आहेत. या बदलांचा परिणाम सामान्य माणसापासून ते व्यवसायापर्यंत सर्वांवर होणार आहे. यामध्ये एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड यासारख्या बाबींचा आणि UPI पेमेंट, पॅन कार्ड अर्ज, तत्काळ ट्रेन तिकीट बुकिंग, जीएसटी रिटर्न समावेश आहे.
Train Ticket Booking युपीआय चार्जबॅकचा नवीन नियम
बॅंकेला नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून आत्तापर्यंत कोणत्याही व्यवहारांमध्ये चार्जबॅकसाठी क्लेम रिजेक्ट केल्यास परवानगी घेत पुन्हा प्रक्रिया करावी लागत होती. आताचा र्जबॅक क्लेमची प्रक्रिया 20 जून 2025 च्या नियमांनुसार बॅंके स्वत: योग्य दुसऱ्यांदा करु शकणार आहे. त्यासाठी एनपीसीआयच्या परवानगीची आवश्यकत नसणार आहे. त्यामुळे ग्राहकांचे व्यवहार जलदगतीने होणार असून समाधान होणार आहे.
Train Ticket Booking नवीन पॅनकार्डसाठी आधार कार्ड बंधनकारक.
आता कोणत्याही व्यक्तीला नवे पॅनकार्ड बनवायचे असेल तर त्याला आधार कार्डची आवश्यकता आहे. आत्तापर्यंत कोणत्याही ओळखपत्र आणि जन्माच्या प्रमाणपत्रावरुन पॅनकार्डची प्रक्रिया केली जात होती. मात्र आता आधार कार्डची आवश्यकता 1 जुलै 2025 पासून असणार आहे.
Train Ticket Booking रेल्वेच्या तिकीटासाठी ओटीपी अन् आधार कार्डची आवश्यकता…
आता तुम्हाला रेल्वे तिकीट बुकींग करावयाचे असल्यास या प्रक्रियेमध्ये बदल करण्यात आला आहे. आयआरटीसी वेबसाईट आणइ मोबाईल अॅपवरुन 1 जुलै 2025 पासून तिकीट बुकींग करण्यासाठी आधार कार्डच्या व्हेरिफिकेशनची आवश्यकता असणार आहे. तिकीट बुकींगसाठी 15 जुलै 2025 पासून ओटीपीची आवश्यकता असणार आहे. हा नियम ऑनलाईन बुकींग आणि पीआरएस काऊंटरवरुन बुकींग करणाऱ्यांसाठी लागू आहे.
याव्यतिरिक्त अधिकृत तिकीट एजंट बुकींगचे काऊंटर उघडण्याच्या अर्धा तास अगोदर तिकीट बुकींग करु शकणार नाहीत. एसी क्लास तिकीटांसाठी सकाळी 10 वाजता ते 10 : 30 पर्यंत. नॉन एसी तिकीटांसाठी सकाळी 11 वाजता ते 11 : 30 पर्यंत प्रतिबंध असणार आहे.
Train Ticket Booking जीएसटी रिटर्नच्या नियमांमध्ये बदल..
जुलै 2025 पासून जीएसटीआर-3B फॉर्म एडीट करता येणार नाही. आता कोणतेही करदाते मागील तीन वर्षांचा जीएसटी रिटर्न फाईल करु शकणार नाहीत. हा नियम रिटर्न फॉर्मवर लागू असणार आहे.