24.4 C
New York

Toll For Two Wheelers : आता दुचाकी वाहनांनाही द्यावा लागणार टोल, १५ जुलैपासून लागू होणार नियम

Published:

मोठी बातमी राष्ट्रीय महामार्ग वापरणाऱ्या दुचाकी (Toll For Two Wheelers) वाहनांसाठी येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता दुचाकी वाहनांना राष्ट्रीय महामार्गाच्या टोलवरही कर भरावा लागणार असून, हा नियम १५ जुलैपासून लागू होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Toll For Two Wheelers FASTag द्वारे भरावा लागणार टोल

नवीन नियमानुसार, दुचाकी वाहनांना FASTag द्वारे टोल भरावा लागणार असून, नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना २००० रुपये दंड भरावा लागणार आहे. यापूर्वी जेव्हा तुम्ही दुचाकी खरेदी करता तेव्हा त्या वेळी टोल कर वसूल केला जातो. त्यामुळे जेव्हा दुचाकी वाहने राष्ट्रीय महामार्गावरील टोल प्लाझावरून जातात तेव्हा त्यांच्याकडून टोल वसूल केला जात नव्हता. तर फक्त चारचाकी वाहनांसह मोठ्या वाहनांकडून टोल घेतला जात होता. परंतु, आता नव्या नियमानुसार दुचाकी वाहनचालकांनादेखील येत्या 15 जुलैपासून NHAI वरून जाणाऱ्या टोल भरावा लागणार आहे.

Toll For Two Wheelers 15 ऑगस्टपासून FASTag चा वार्षिक पास

यापूर्वी टोलच्या नियमात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार येत्या 15 ऑगस्टपासून वाहनचालकांना फास्टटॅगचा वार्षिक पास बनवता येणार आहे. वार्षिक 3 हजार रूपयांचा हा पास असेल केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) अशी मोठी घोषणा केली आहे.

खाजगी वाहनांसाठी (जसे की कार, जीप, व्हॅन इ.) ३,००० रुपयांचा फास्टॅग १५ ऑगस्ट २०२५ पासून (Fastag) आधारित वार्षिक पास जारी केला जाईल. एक वर्ष किंवा २०० ट्रिपसाठी, जे आधी असेल ते हा पास सक्रिय झाल्याच्या तारखेपासूनवैध असेल. एक स्वतंत्र लिंक NHAI आणि MoRTH च्या वेबसाइटवर आणि ‘हायवे ट्रॅव्हल अॅप’ वर या पाससाठी लवकरच उपलब्ध करून दिली जाईल, ज्यामुळे पासचे सक्रियकरण आणि नूतनीकरण सोपे आणि सोयीस्कर होईल असे गडकरी यांनी म्हटले आहे.

Toll For Two Wheelers नवीन पासचा नेमका उद्देश काय?

नवीन वार्षिक पास धोरणाचा उद्देश ६० किमीच्या परिघात असलेल्या टोल प्लाझांशी संबंधित दीर्घकालीन समस्या सोडवणे आहे. टोल पेमेंट एकाच डिजिटल व्यवहाराद्वारे सोपे करणे, प्रतीक्षा वेळ टोल प्लाझावरील कमी करणे, गर्दी कमी करणे आणि वादाचे प्रसंग टाळणे यासाठी होणार आहे.

Toll For Two Wheelers फास्टॅग म्हणजे काय?

फास्टॅग हे एक उपकरण आहे जे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) तंत्रज्ञानाचा वापर करते. ज्यामुळे प्रीपेड खात्यातून टोल पेमेंट थेट त्याच्याशी जोडलेल्या करता येते. विंडस्क्रीनवर ते तुमच्या वाहनाच्याचिकटवले जाते आणि तुम्हाला रोख व्यवहारांसाठी न थांबता टोल प्लाझातून जाण्याची परवानगी देते. तुम्हाला तुमच्या गरजेनुसार टॅग रिचार्ज/टॉप अप करावा लागतो.

Toll For Two Wheelers फास्टॅगचे फायदे

FASTag वापरण्याचे अनेक फायदे आहेत. वाहनचालकांना त्यांच्या टॅग खात्यात याच्या वापरामुळे केलेल्या सर्व व्यवहारांसाठी नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एसएमएस अलर्ट मिळतो. टोल पेमेंटसाठी रोख रक्कम यामुळे वाहनचालकांना जवळ बाळगावी लागत नाही. फास्टटॅग खाते डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारेऑनलाइन रिचार्ज करता येते. याशिवाय, लॉग इन करून त्यांचे स्टेटमेंट ग्राहक FASTag ग्राहक पोर्टलवर पाहू शकतात

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img