24.4 C
New York

Devendra Fadnavis : वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! वीजदरात कपात होणार, CM फडणवीसांची मोठी घोषणा

Published:

दररोज वाढत असणाऱ्या महागाईत सर्वसामान्य नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. प्रथमच वीजदरात राज्यातील इतिहासात कपात केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 10 टक्के आणि टप्प्याटप्प्याने पहिल्यावर्षी कपात करीत 26 टक्के वीजदर 5 वर्षांत कमी होणार असल्याची माहितीदिली आहे. आगामी पाचही वर्षात घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांच्या वीजदरात कपात करण्यात येणार असल्याची देखील माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे. ट्विटमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे की, पहिल्यावर्षी 10 टक्के आणि टप्प्याटप्प्याने कपात करीत राज्याच्या इतिहासात प्रथमच 5 वर्षांत 26 टक्के वीजदर कमी होणार आहेत. महावितरणच्या याचिकेवर महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) हा निकाल दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.

राज्यातील वीज ग्राहकांसाठी वीजदर ठरवण्यासाठी महावितरणाने दाखल केलेल्या याचिकेवर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने (MERC) निर्णय दिला आहे. एमईआरसीने घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांच्या वीजदरात आगामी पाचही वर्षात कपात करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे आता घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांच्या वीजदरात आगामी पाचही वर्षात कपात करण्यात येणार आहे. साधारणत: पूर्वीचा काळ पाहिला तर 10 टक्के वीजदरवाढीच्या याचिका सादर व्हायच्या. पण, प्रथमच महावितरणने राज्याच्या इतिहासात वीजदर कमी करण्यासाठी याचिका केली. त्यावरच हा आदेश एमईआरसीने दिला. या आदेशाचा लाभ घरगुती ग्राहक, औद्योगिक ग्राहक आणि व्यावसायिक ग्राहक अशा तिन्ही वर्गवारीत होणार आहे.

राज्यात 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणार्‍यांचे प्रमाण हे 70 टक्के आहे. त्यांच्यासाठी 10 टक्के इतके सर्वाधिक दर कमी होतील. आमच्या बळीराजाला दिवसा आणि खात्रीचा वीजपुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 चे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सोबतच हरितऊर्जेवर आगामी काळात वीजखरेदी करारांमध्ये मोठ्या प्रमाणात भर दिल्यामुळे वीजखरेदी खर्चात बचत होणार आहे.महावितरणला त्यामुळेच हा दर कमी करण्याचा प्रस्ताव मांडता आला. राज्यातील जनतेला ही बातमी देताना मला आनंद होतो आहे. असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img