राज्यात मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने सध्या दडी मारली आहे. (Rain Alert) महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र, आता पुन्हा एकदा आता मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या मान्सूनने जोर पकडण्यास सुरुवात केली आहे. (Weather) पुढील दोन-तीन दिवसांत मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रात मान्सून अधिक सक्रिय होणार आहे. मुसळधार पाऊस या काळात होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात येत्या काही दिवसात मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई शहर आणि उपनगरांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर दक्षिण कोकणात विशेषतः रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पावसाने जोरदार हजेरी मे महिन्यात लावल्यानंतर जूनच्या सुरुवातीला काही दिवस विश्रांती घेतली होती. मात्र, आता हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहर आणि उपनगरांत जोरदार पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकणातील रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. कोकण किनारपट्टीला त्यामुळे पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
या सर्व जिल्ह्यांतील नागरिकांना आणि विशेषतः मच्छीमारांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. नद्यांना पूर येण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्क राहावं, असंही आवाहन करण्यात आलं आहे. अचानक येणाऱ्या जोरदार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवासाचं नियोजन करताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केलं आहे. महाराष्ट्रात दमदार मान्सून एकूणच पुढील काही दिवस होईल, असा अंदाज आहे.