23.5 C
New York

Malegaon Factory Election : माळेगाव कारखान्यासाठी आज मतदान, चौरंगी लढत

Published:

आज २२ जून २०२५ रोजी बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी (Malegaon Factory Election) मतदान पार पडत आहे. मतदानालाआज सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक दिग्गजांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मात्र अद्यप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे मतदानाचा हक्क बजावणार का, याबाबत उत्सुकता कायम आहे. विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे ब वर्ग संस्था प्रतिनिधी म्हणून या निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. एकूण चार पॅनल या निवडणुकीच्या आखाड्यात उतरले असून अजित पवारांच्या विरोधात माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सहकार महर्षी चंद्रराव तावरे आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वातील पॅनल मैदानात आहेत. 21 जागांसाठी 90 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 24 जूनला मतमोजणी होणार आहे. मतदान प्रक्रियेला सुरूवात झाल्यानंतर काही वेळातच सुप्रिया सुळे आणि अजित पवारांनी मतदान केलं.

Malegaon Factory Election निवडणूक यंदा अत्यंत लक्षवेधी

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांच्यातील मुख्य लढतीमुळे माळेगाव सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक यंदा अत्यंत लक्षवेधी ठरत आहे. एकूण चार पॅनल आणि काही अपक्ष उमेदवार यंदा रिंगणात आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ‘श्री नीलकंठेश्वर पॅनल’, चंद्रराव तावरे आणि रंजनकुमार तावरे यांचा ‘सहकार बचाव शेतकरी पॅनल’, शरद पवार गटाचा ‘बळीराजा शेतकरी सहकार बचाव पॅनल’, आणि ‘कष्टकरी शेतकरी संघर्ष समिती’ हे प्रमुख पॅनल आहेत. शरद पवार गट आणि संघर्ष समितीचा कोणाला फटका बसेल, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. अजित पवार यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर करत “मीच चेअरमन होणार” असे स्पष्ट करताच या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. त्यांच्या विरोधात चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांनी प्रभावी प्रचार केला असून, अजित पवारांना दहा ते बारा सभा घ्याव्या लागल्या.

Malegaon Factory Election निवडणूक व्यवस्थापन आणि मतदान

सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आज रविवारी 22 जून रोजी मतदान पार पडणार आहे. रिंगणात एकूण ९० उमेदवार असून, 67 मतदान केंद्रेकारखान्याचे निश्चित करण्यात आली आहेत:

गट क्रमांक 1 – माळेगाव : 11 केंद्रे

गट क्रमांक 2 – पणदरे : 13 केंद्रे

गट क्रमांक 3 – सांगवी-कांबळेश्वर : 8 केंद्रे

गट क्रमांक 4 – खांडज-शिरवली : 7 केंद्रे

गट क्रमांक 5 – निरावागज : 12 केंद्रे

गट क्रमांक 6 – बारामती : 15 केंद्रे

ब वर्गासाठी : 1 केंद्र

एकूण मतदान केंद्रांची संख्या – 67

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img