28.2 C
New York

Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धात अमेरिका, इराणच्या 3 अणू प्रकल्पांवर बॉम्ब हल्ले

Published:

इस्रायल आणि इराणमधील (Iran Israel War) युद्धाची मोठी धग जगात सुरू असतानाच आता जे युद्ध मिटवण्याच्या गप्पा करत होते त्या अमेरिकेने (America) यात उडी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेच्या हवाई दलाने फोर्डो, नतान्झ आणि एस्फहान अणू उर्जा केंद्रांवर हल्ला केला आहे.

अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याबाबत माहिती दिली आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेने इराणच्या तीन प्रमुख अणू उर्जा केंद्रांवर हल्ला केला आहे. फोर्डो, नतान्झ आणि इस्फहानवर या केंद्रांवर यशस्वी हवाई हल्ला केला आहे. अमेरिकन सैन्याने पूर्ण तयारीने या ठिकाणांवर बॉम्ब टाकले. ज्यामध्ये फोर्डो हे मुख्य लक्ष्य होते.

सोशल मीडियावर डोनाल्ड ट्रम्प यांनी लिहिलं की, फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान येथील तीन अणुस्थळांवर आम्ही इराणमधील यशस्वी हल्ले केले आहेत. संपूर्ण पेलोड फोर्डोवर बॉम्बचा टाकण्यात आला.इराणी हवाई हद्दीतून आमची सर्व लढाऊ विमाने हल्ले करुन आता सुरक्षितपणे बाहेर पडली आहेत. जगातील इतर कोणत्याही सैन्याकडे ही क्षमता नव्हती. अमेरिकेच्या लष्करी सामर्थ्याचे हे यश आहे. आता शांततेची वेळ आली आहे.

अमेरिकेने काही तास आधी अमेरिकन हल्ल्याच्या त्यांचे स्टिल्थ बी-२ बॉम्बर्स इराणकडे पाठवले होते. या निर्णयानंतर अमेरिका या युद्धात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर काही तासांतच अमेरिकेने इराणचे ३ अणू प्रकल्प उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आहे. बी-२ बॉम्बर्स हे एकमेव विमान आहे जे बंकर बस्टर बॉम्ब टाकण्यास सक्षम आहे. या बी-२ बॉम्बर्सने अमेरिकेने फोर्डो नष्ट केले आहे.

इराणविरुद्ध इस्रायलच्या लष्करी मोहिमेचा निर्णय घेण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन आठवडे घेतले होते. त्यांनी दोन आठवड्यात निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. ट्रम्प यांच्या या विधानाच्या आदल्या दिवशी अमेरिकेने त्यांचे अत्याधुनिक लढाऊ विमान बी२ बॉम्बर्स प्रशांत महासागरात असलेल्या त्यांच्या ग्वाम हवाई तळाकडे पाठवले होते. दरम्यान, आता स्थानिक वेळेनुसार, रात्री १० वाजता डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राला संबोधित करतील.

Iran Israel War तर भविष्यात मोठे हल्ले होतील

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी इशाराही दिला आहे. ते म्हणाले की, अमेरिकन सैन्याने जे केले आहे ते कोणतेही सैन्य करू शकले नसते. जर इराणने शांतता प्रस्थापित केली नाही तर भविष्यात त्यांच्यावर होणारे हल्ले खूप मोठे असतील, असंही ते म्हणाले आहेत. अमेरिकेकडून हल्ला करण्यात आल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. इराणवर हल्ला करण्याचा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा निर्णय इतिहास बदलेल, असं नेतान्याहू यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानानंतर हे युद्ध मोठ्या संकटाकडं जाणार आहे असं दिसून येत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img