गेल्या काही दिवसांपासून इराण आणि इस्त्रायल या दोन देशांत जोरदार युद्ध सुरू असून, इतिहासात डोकवल्यास इराणचा युद्ध इतिहास खूप जुना (Iran Israel Conflict) असल्याचे दिसून येते. अनेकवेळा हा देश हरला, अनेक वेळा जिंकला. अनेक वेळा युद्धबंदीसारखी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे इतिहासाची पाने इराणच्या युद्धांनी भरलेली आहेत. आता जेव्हा इराण पुन्हा एकदा इस्रायलशी युद्ध लढत आहे, तेव्हा ही पाने पुन्हा नव्याने उलगडली जात असून अनेक मनोरंजक गोष्टीही समोर येत आहेत. त्याचाच घेतलेला हा आढावा…
1040 च्या सुमारास बुयद राजवंशाचा नाश झाला. सुन्नी तुगरुल बेग बगदादला गेला आणि अब्बासी खलिफाकडून “सुलतान” ही पदवी घेतली. त्यानंतर सेल्जुक तुर्कांनी दांडनाकानच्या लढाईत गझनवी शासक मसूदचा पराभव केला. त्यानंतर त्यांनी खुरासान आणि इराणचा मोठा भाग ताब्यात घेतला. या काळातउमर खय्याम, अल-गझाली आणि निजाम अल-मुल्क सारखे विद्वान उदयास आले. दरबाराची भाषा म्हणून मात्र, सेल्जुकांनी पर्शियन भाषा ठेवली. या सर्व युद्धांचा परिणाम असा झाला की, सुन्नी शासकांनी पर्शियन परंपरेने इस्लामिक-तुर्की राज्य स्थापन केले. पर्शियन संस्कृती त्यांनी नष्ट केली नाही, तर ती स्वीकारली. इतिहासातील या काळाला पर्शियन-इस्लामिक संस्कृतीचा सुवर्णकाळ असेही म्हटले जाते.
Iran Vs Israel चंगेज खानने युद्ध सुरू केले अन् नातवाने साम्राज्याची स्थापना केली
मंगोल नेता चंगेज खानची नजर13 व्या शतकाच्या सुरुवातीला या प्रदेशावर पडली. पुन्हा युद्धे या प्रदेशात 1219 ते 1260 दरम्यान सुरू झाली. साम्राज्याचा विस्तार आणि व्यापारी मार्ग काबीज करण्याच्या उद्देशाने चंगेज खानने हल्ले सुरू केले. त्यावेळी ख्वारिझम शाही साम्राज्य इराणवर राज्य करत होते. अनेक शहरे उद्ध्वस्त झाली. मोठ्या संख्येने लोक मारले गेले.
पश्चिम आशियात विस्ताराची मोहीम चंगेज खानच्या पुढच्या पिढीतील हुलागूने काही दिवस राज्य केल्यानंतर सुरू केली. त्याने बगदादवर हल्ला केला आणि अब्बासी खलिफाचा वध केला. त्यानंतर इराणमध्ये इल्खानिद साम्राज्याची स्थापना झाली. या युद्धामध्ये लाखो लोकांचे प्राण गेले. अनेक बौद्धिक आणि सांस्कृतिक केंद्रे उद्ध्वस्त झाली एवढेच नव्हे तर, अर्थव्यवस्थादेखील कोलमडली. तथापि, इस्लाम स्वीकारला आणि पर्शियन संस्कृती नंतर मंगोल शासकांनी स्वीकारली.
Iran Vs Israel तेव्हा इस्त्रायल इराणच्या पाठिशी उभा राहिला
22 सप्टेंबर 1980 रोजी ऐतिहासिक काळातील आणखी एक मनोरंजक गोष्ट युद्धांच्या म्हणजे इराकचे राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसेन यांनी जेव्हा इराणवर हल्ला केला तेव्हा ठामपणे इस्रायल इराणच्या पाठीशी उभा राहिला होता. इराकची राजधानी बगदादजवळील अणुभट्टीवर बॉम्बहल्ला 7 जून 1981 रोजी इस्रायलने करत तो पूर्णपणे उद्ध्वस्त केला होता. त्यावेळी मेनकेम बेगिन इस्रायलचे पंतप्रधान होते. त्यांना भीती होती की, जर इराकने अणुशस्त्रे बनवली तर, ते इस्रायलवर हल्ला करतील आणि हीच भीती आज इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या मनात इराणबाबत आहे.